ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : किरीट सोमय्या
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्याच्या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे (Kirit Somaiya on transfer of Pravin Pradeshi).
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची बदली करण्याच्या निर्णयावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सडकून टीका केली आहे (Kirit Somaiya on transfer of Pravin Pradeshi). ठाकरे सरकारला उत्तर देता येत नसल्यानं त्यांनी प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागील 50 दिवस कोरोनाची लढाई सुरु आहे. या काळात राजकीय नेतृत्व काय करत होतं असाही प्रश्न सोमय्या यांनी विचारला. तसेच या परिस्थितीसाठी राजीनामा घ्यायचा असेल तर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राजकीय नेतृत्वाचा घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
किरीट सोमय्या म्हणाले, “प्रविण परदेशी यांनी केवळ बळीचा बकरा बनवला आहे. मागील 23 वर्षे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे परिवाराचं राज्य आहे. आता ठाकरे परिवारातील व्यक्ती मुख्यमंत्री देखील आहे. ठाकरे परिवारीतील एक व्यक्ती मुंबईचे पालकमंत्री आहेत. मागील 50 दिवस कोरोनाची लढाई सुरु आहे. मग ती ही लढाई केवळ प्रशासन चालवत होतं का? जर असं असेल तर मग राजकीय नेतृत्त्व काय करत होतं? मुख्यमंत्री घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यांची तेवढीही हिंमत नाही का?”
वास्तविकपणे प्रविण परदेशी यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पालकमंत्री असताना त्यांच्याच मतदारसंघ असलेल्या वरळीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. दुसरा क्रमांक धारावीचा आहे. तिथंही एक कॅबिनेट मंत्री आहेत. ते सर्व आरोप केवळ प्रशासनावर करत आहेत. ज्या अश्विनी भिडे यांना ठाकरे परिवाराने अपमानित केलं, त्यांना घरी बसवलं होतं त्यांनाच यांनी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त बनवलं. याचं नेमकं काय चाललं आहे? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी विचारला.
Mumbai bacame “Corona Capital” of India. Now Thackeray Sarkar made BMC Commissioner Praveen Pardeshi “Bali ka Bakra” Scapegoat. Political Leadership.. Both Guardian Ministers of Mumbai must accept the Responsibility @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BJP4India @ChDadaPatil pic.twitter.com/hwWkMsqmm7
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 8, 2020
“राजकीय नेतृत्वाचा राजीनामा घ्या”
किरीट सोमय्या यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या परिस्थितीला राजकीय नेतृत्वाला जबाबदार धरण्याची मागणी केली. ते म्हणाले, “राजीनामा घ्यायचा असेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजकीय नेतृत्वाने राजीनामा द्यावा. हे सरकार मुंबईची घोर हत्या करत आहे आणि बळीचा बकरा प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलं जात आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी प्रशासकीय अधिकारी लपवत नसून राजकीय नेते लपवत आहेत. वरळीचा आकडा 25 एप्रिलनंतर आलेला नाही. यांनी दारु दुकानं सुरु केली. पूर्ण पोलीस यंत्रणा दारु दुकानांच्या भोवती कामाला लागली. ही पोलीस यंत्रणा आयुक्तांकडे नव्हती. ठाकरे सरकारला उत्तर देता येत नाही म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवलं.”
संबंधित बातम्या :
BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं
वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!
ऑर्थर रोड जेलमध्ये 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोना
संबंधित व्हिडीओ :
Kirit Somaiya on transfer of Pravin Pradeshi