कुणाल कामराचे खोचक ट्विट; अर्णब गोस्वामींना पुन्हा डिवचले

कुणाल कामराने ट्विटरवरून मिम शेअर करत अर्णब गोस्वामी यांना डिवचले आहे. | Kunal Kamra

कुणाल कामराचे खोचक ट्विट; अर्णब गोस्वामींना पुन्हा डिवचले
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 12:24 PM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत असलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने ट्विटरवर एक मिम शेअर केले आहे. यामध्ये संजय राऊत आणि कुणाल कामरा पोलिसाच्या वेषात दिसत असून त्यांनी अर्णब गोस्वामी यांना पकडल्याचे दाखवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. यामध्ये रिपब्लिक वृत्तवाहिनीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. सध्या मुंबई पोलिसांकडून टीआरपी स्कॅमचा तपास सुरु आहे. याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.  (Kunal Kamra shares Meme on Twitter)

या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने ट्विटरवरून मिम शेअर करत अर्णब गोस्वामी यांना डिवचले आहे. जानेवारी महिन्यात कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी इंडिगो एअरलाईन्सच्या एकाच विमानाने प्रवास करत होते. त्यावेळी कुणाल कामराने अर्णब गोस्वामी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. कुणाल कामरा याने अनेकदा अर्णब गोस्वामीच्या पत्रकारितेच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित केले होते. अर्णब गोस्वामी याच्यासोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत इंडिगो, एअर इंडिया, स्पाईस जेट आणि गो एयर या कंपन्याकंडून कुणाल कामरावर सहा महिन्यांची प्रवासबंदी घालण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच कुणाल कामराने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालणार आहे, असे तिरकस ट्विट केले होते. ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टमध्ये राऊतांची मुलाखत झाल्यापासून कामरा त्यांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. ही मुलाखत लवकरच यूट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत या मुलाखतीचे चित्रीकरण पार पडले होते. राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकास आघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगली.

संबंधित बातम्या:

संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल, कुणाल कामराचे भाजपला

सुप्रिया सुळे कुणाल कामराच्या भेटीला, ‘शट अप या कुणाल’मध्ये मुलाखत रंगणार?

उखाड दिया मुलाखत… ‘शटअप या कुणाल’च्या सेटवर रंगला कामरा-राऊतांचा सामना

(Kunal Kamra shares Meme on Twitter)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.