AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

ग्रंथालयांची कवाडे खुली करा या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेतली. (Library Delegation Meet Raj Thackeray at krishna kunj) 

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 12:13 PM

मुंबई : राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज्यातील ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी ग्रंथालय पुन्हा सुरु करा, अशी मागणी करत राज ठाकरेंना निवेदन दिलं. (Library Delegation Meet Raj Thackeray at krishna kunj)

पुस्तकं ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात त्याची फार आवश्यकता आहे. म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये बंद केलेली ग्रंथालये पुन्हा सुरु करण्यात यावीत. त्यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होईल. त्यावर अवलंबून असलेल्या अर्थचक्रालाही गती मिळेल, असे ग्रंथालय प्रतिनिधींनी राज ठाकरेंना सांगितले

राज्यात पुनश्च हरी ओम अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याच अनुषंगाने राज्यातील ग्रंथालये सुरु करण्यात यावी, ही मागणी घेऊन ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.

काही दिवसांपूर्वी डोंगरी येथील कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली होती.

राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?

  • मूर्तीकार
  • डबेवाले
  • जिमचालक
  • कोळी महिला
  • वीजबिल ग्राहक
  • पुजारी
  • डॉक्टरांचे शिष्टमंडळ
  • ‘अदानी’चे अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला! (Library Delegation Meet Raj Thackeray at krishna kunj)

संबंधित बातम्या :

केंद्राने POP वरील बंदी उठवावी, मूर्तिकारांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीला चाप लावा, राज ठाकरेंची पत्राद्वारे मागणी

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.