Mumbai Power Cut LIVE : अडीच तासांनी वीजपुरवठा सुरळीत, मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली

मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. (Mumbai Thane Power cut )

Mumbai Power Cut LIVE : अडीच तासांनी वीजपुरवठा सुरळीत, मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 2:47 PM

मुंबई: मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे.  वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर येत तआहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले. ( Major Power Shutdown in Mumbai)

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवाठा खंडित प्रकरणी बैठक बोलावली” date=”12/10/2020,2:28PM” class=”svt-cd-green” ] मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवाठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 4 वाजता वर्षा येथे महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी,” date=”12/10/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ] मुंबई महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी, अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क साधण्याचं आवाहन 022-22694727, 022-226947725, 022-22704403 [/svt-event]

[svt-event title=” मुंबईतील शस्त्रक्रिया सुरळीत” date=”12/10/2020,1:00PM” class=”svt-cd-green” ] दरम्यान,  मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका रुग्णालयांना बसला. विजेअभावी महापालिका रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र मुंबई महापालिकेतील कोणत्याही शस्त्रक्रिया पुढे ढकललेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं. [/svt-event]

[svt-event title=”ऊर्जामंत्र्यांचं स्पष्टीकरण ” date=”12/10/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. [/svt-event]

ऊर्जामंत्र्यांचं स्पष्टीकरण 

महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

माजी ऊर्जामंत्र्यांचा हल्लाबोल

“मुंबईत एकाच वेळेस 2 हजार मेगा वॅटचं फेल्युअर होणे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. हा तांत्रिक मुद्दा असला तरीही, झालेलं फेल्युअर वेळेवर अटेंड न केल्यामुळे, मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला”, असा हल्लाबोल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऊर्जामंत्र्यांशी चर्चा वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करुन अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.

या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही भागांमध्ये अशाचप्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी दोन ते तीन तासांत वीजपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र, आताचा बिघाड तुलनेत मोठा असल्याने मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी किती कालवधी लागेल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

मुंबईत इतक्या मोठ्याप्रमाणावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ट्रेनमधील पंखे आणि लाईटही बंद झाले आहेत. याशिवाय, रस्त्यावरील सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणाही पूर्णपणे बंद पडली आहे.

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

तसेच यामुळे सर्व भागांतील रुग्णालये आणि कोरोना केंद्रातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीजपुरवठा लवकर पूर्ववत न झाल्यास व्हेटिंलेटवर व इतर अत्यावश्यक उपचारांसाठी लागणारी यंत्रणा ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा कधी सुरळीत होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणकोणत्या भागात वीज गायब?

  • दादर
  • लालबाग
  • परळ
  • प्रभादेवी
  • वडाळा
  • ठाणे
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • बोरिवली
  • मालाड
  • कांदिवली
  • पेण
  • पनवेल
  • उरण
  • कर्जत
  • खालापूर

कल्याण परिसरात जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

कळवा पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 आणि केबी-2 हे दोन फिडर सकाळी 10 वाजून 5 ते 7 मिनिटापासून बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत आहे.

संबंधित बातम्या:

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

mumbai power cut ! मुंबई-ठाण्याला विजेचा झटका, रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही

( Major Power Shutdown in Mumbai)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.