Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार

राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी गंभीर नाही. मंत्री आणि प्रशासनातील अधिकारीही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. | Maratha Reservation

मराठा आरक्षणावर आता तुम्हीच मार्ग काढा; मराठा आंदोलक शरद पवारांना भेटणार
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 9:47 AM

मुंबई: शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केले. तसेच आता त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. यासाठी आम्ही लवकरच शरद पवार यांची भेट घेण्यात असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी सांगितले. (Maratha kranti Morcha will meet Sharad Pawar)

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे. त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. मात्र, तुर्तास शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात मोजके आणि सावधपणाने बोलण्यावर भर देत आहेत. मात्र, आता मराठा क्रांती मोर्चाचे थेट त्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे मार्गदर्शक आणि संकटमोचक असलेले शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

आबा पाटील यांनी यासंदर्भाती ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना माहिती दिली. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी गंभीर नाही. मंत्री आणि प्रशासनातील अधिकारीही हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. आता सरकारी नोकरभरतीत मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेवून प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी केली जात आहे. हा म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही, असे आबा पाटील यांनी ठणकावून सांगितले.

‘मराठा आरक्षण उपसमितीचा उपयोगच झाला नाही’ मराठा आरक्षणाचा प्रश्न जलदरित्या मार्गी लावण्यासाठी जी उपसमितीत स्थापन करण्यात आली होती, त्याचा उपयोगच झाला नाही. आरक्षण कधी मिळणार, याची कालमर्यादा निश्चित झाली पाहिजे. एक तर सरकारने ही उपसमिती बरखास्त करावी. अन्यथा या उपसमितीवर जबाबदार आणि काम करणाऱ्या लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली.

‘मराठा समाजाशिवाय मेगाभरती होऊच देणार नाही’ राज्यात शासकीय विभागात मराठा विद्यार्थ्यांना घेतल्याशिवाय नोकरभरती होऊ देणार नाही. राज्यात 72 हजार जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली. पण मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ही मेगाभरती थांबवण्यात आली. मग आता सहा हजार नियुक्त्या करण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल मराठा आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला. संबंधित बातम्या:

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

‘शरद पवारांनी मराठा आरक्षणाविषयक भूमिका स्पष्ट करावी; मग आम्ही पुढची दिशा ठरवू’

(Maratha kranti Morcha will meet Sharad Pawar)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.