…तर 10 मेपासून पुन्हा मराठा समाजाचं आंदोलन
मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मराठा आरक्षण लागू न केल्याने मराठा ठोक मोर्चा आक्रमक होत, सरकारला अल्टिमेटम दिला आहे. उद्यापर्यंत (8 मे) राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली. तसेच, जर शुक्रवारपर्यंत (10 मे) निर्णय झाला नाही, तर मराठा समाजाकडून आंदोलन […]
मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मराठा आरक्षण लागू न केल्याने मराठा ठोक मोर्चा आक्रमक होत, सरकारला अल्टिमेटम दिला आहे. उद्यापर्यंत (8 मे) राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली. तसेच, जर शुक्रवारपर्यंत (10 मे) निर्णय झाला नाही, तर मराठा समाजाकडून आंदोलन छेडू, असा इशाराही मराठा ठोक मोर्चाने दिला.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही, यासाठी राज्य सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा ठोक मोर्चाने वैद्यकीय शिक्षण उपसंचालकांना दिला आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षणाचा निर्णय संचालकांच्या हातात नाही, अशी वैद्यकीय संचालकांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना माहिती दिली. तसेच, या संदर्भात निर्णय घेणं राज्य सरकारच्या हातात असून, मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न न्यायालयात दाखल करण्यात आल्याने सरकार निर्णय घेईल, असेही संचालकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात 50 हून अधिक मोर्चे अगदी शांततेत निघाले. प्रचंड मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं. 30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येणार नाही.
मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटीफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांचे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.