AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलाब्यातील ज्वेलर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन

'महावीर ज्वेलर्स' या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

कुलाब्यातील ज्वेलर्सचा मराठीत बोलण्यास नकार, मराठी लेखिकेचे दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन
Updated on: Oct 09, 2020 | 3:53 PM
Share

मुंबई : मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सच्या दुकानासमोर मराठी लेखिकेने ठिय्या मांडला आहे. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या शोभा देशपांडे यांनी दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. (Marathi Writer Shobha Deshpande protests against Mahavir Jewelers shop who denies to speak in Marathi)

कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासही त्या तयार नाहीत. मराठी एकीकरण समिती संघटनेच्या काही मराठी शिलेदारांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र देशपांडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पोलिसात तक्रार दाखल करु असे समजावल्यानंतर त्यांनी पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगितले. मी इथून हलणारच नाही या भूमिकेवर त्या ठाम आहेत. कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रात्री बारा वाजेपर्यंत त्या एकाच जागी ठिय्या मांडून बसल्या होत्या.

कोण आहेत शोभा देशपांडे?

शोभा देशपांडे या लेखिका आहेत. मराठी भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. त्यातूनच महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले. मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (Marathi Writer Shobha Deshpande protests against Mahavir Jewelers shop who denies to speak in Marathi)

त्यांचे वय 75 पेक्षा जास्त असून शोभा देशपांडे अन्नपाण्याविना एकाच जागी जवळपास सात तासाहून अधिक काळ आंदोलन करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

(Marathi Writer Shobha Deshpande protests against Mahavir Jewelers shop who denies to speak in Marathi)

ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम
ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम.
त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय.
त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय..
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप.
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश.
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर.
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य.
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?.
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया.