Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक

बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' आंदोलन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 09, 2020 | 6:02 PM

मुंबई : मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणारं अनुदान राज्य शासनाने (Mayor Kishori Pednekar) आणि महापालिकेने बंद करावं. अशी मागणी करणारं पत्र शिवसेना नगरसेवकांनी विभागप्रमुख आणि महापौर यांच्या नावे लिहावं, असं जाहीर विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसत आहे (Mayor Kishori Pednekar).

बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज (9 ऑगस्ट) लालबाग येथे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या, तर जे कर्नाटक लोक आहेत त्यांना समजेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत”, असेही पेडणेकर म्हणाल्या (Mayor Kishori Pednekar).

राज्यात कोल्हापूरसह सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलनं होत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

Mayor Kishori Pednekar

संबंधित बातम्या :

Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा‌ हार, शिवभक्त आक्रमक

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.