मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

येत्या 21 सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. (MNS activist travel from Mumbai Local to restart train)

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 12:04 PM

मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल लवकर सुरु करा, अशी मागणी विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 21 सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी यांनी याबाबतची माहिती दिली. (MNS activist travel from Mumbai Local to restart train)

“आज सर्वसामान्य जनतेला कामावर जाताना त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये गेलं तरी गर्दी, रस्त्यावरुन गेलं तरी गर्दी, हा गर्दीचा त्रास जर वाचवायचा असेल तर रेल्वे प्रवास हा सुरु करावा. पण घरात बसून जे सरकार चालवत आहेत, त्यांना याची काहीच काळजी नाही. त्यासाठी आम्ही मनसेतर्फे 21 सप्टेंबरला आम्ही रेल्वेने प्रवास करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास,” असे संतोष धुरी म्हणाले.

“लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु आहे. पण बसमध्ये प्रचंड हाल होत आहे. जवळपास आठ तास लोकांना घरी जाण्यासाठी लागत आहे. लोकांचे हाल बघवत नाही. वारंवार विनंती करुन सरकार रेल्वे सेवा सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणाहून येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुन सरकार ऐकत नाही. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,” असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.

लोकल सुरु करण्याची वारंवार मागणी 

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. (MNS activist travel from Mumbai Local to restart train)

संबंधित बातम्या :

आधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब

अनिल परब एसटीच्या सर्व प्रवाशांची जबाबदारी घेणार आहेत का? मनसेचा सवाल

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.