MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास

मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन करत आज (21 सप्टेंबर) मुंबईकरांसाठी लोकल रेल्वेमधून प्रवास केला. (MNS Protest For Mumbai Local)

MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 10:06 AM

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेन सविनय कायदेभंग आंदोलन केलं. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande MNS) यांच्यासह मनसे नेत्यांनी  मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन करत मुंबई लोकल रेल्वेने प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे, सरचिटणीस गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह मनसे नेत्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला.

लोकल रेल्वेअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी मनसेची आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (MNS Protest For Mumbai Local)

मनसेचा सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सरचिटणीस संदीप देशपांडेंनी रेल्वे प्रवास केला असताना तिकडे ठाणे स्टेशनवर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.

आंदोलनापूर्वी मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीस 

मनसेच्या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम 149 आणि 144 प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात म्हटलं आहे.

नोटिसीनंतरही मनसे आंदोलनावर ठाम

“नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते”, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

लोकल सुरु करण्याची मागणी 

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. (MNS Protest For Mumbai Local)

संबंधित बातम्या : 

 रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.