AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय

मुंबईत उद्यापासून (6 मे) पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवाच फक्त सुरु राहतील, असे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.

Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 11:04 PM

मुंबई : लॉकडाऊनचे नियम शिथील करत देण्यात (Essential services) आलेल्या मुंबईतील सर्व सवलती आता रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत उद्यापासून (6 मे) पूर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवाच फक्त सुरु राहतील, असे आदेश बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी (BMC Commissioner Pravin Singh Pardeshi) यांनी जारी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार आहेत. मुंबईकरांच्या बेशिस्तपणामुळे आयुक्तांना हा कठोर निर्णय (Essential services) घ्यावा लागला आहे.

महाराष्ट्र सरकारने 4 मेपासून लाॅकडाऊन कालावधी शिथील (Lockdown Rules Relaxation) करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरु करायला परवानगी दिली होती. परंतु, या शिथीलीकरणात लोक अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून सरकारने घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन आयुक्तांनी हा निर्णय घेतला. त्यानुसार, उद्यापासून मुंबईत पूर्वीप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील.

देशात दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3 मे रोजी संपले. 3 मेनंतर राज्य सरकारने काही शहरांमध्ये संचारबंदीत शिथिलता करण्यासंदर्भात काही निर्णय घेतले होते. मुंबईतही काही भागांमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली. पण, नागरिकांकडून त्याचा दुरुपयोग केला जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे अखेर मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मुंबईत पुन्हा कडकडीत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी परिपत्रक जारी केलं आहे.

मुंबईतील सर्व सवलती रद्द

मुंबईतील सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. याआधी जे निर्णय घेण्यात आले आहेत, ते सर्व रद्द करण्यात आले आहेत. लॉकडाऊनदरम्यान मुंबईकरांना आता कोणतीही सवलत मिळणार नाही. मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहातील. मुंबईकर शिस्त पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात (Essential services) आला आहे.

मुंबईत दारुची दुकानं पुन्हा बंद

लॉकडाऊनचे नियम शिथील करत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 4 मेपासून रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबईकरांकडून शिस्त पाळली गेली नाही. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईत अनेक भागांमध्ये दारुची दुकानं सुरु झाली. मात्र, दारु घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. अखेर मुंबई महापालिकेने कडकडीत संचारबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील दारुची दुकानंदेखील बंद राहणार आहेत.

मुंबईत फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळणार

आता मुंबईत पुन्हा पूर्वीप्रमाणे फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. मुंबईत उद्यापासून दूध, किराणाची दुकानं, भाजीपाला, वैद्यकीय सेवा आणि इतर जीवनवाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार आहे.

Essential services

संबंधित बातम्या :

दारु मिळाल्यानंतर आनंद लुटला, खुशी-खुशीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी धुतला

Mumbai Corona Update : बीडीडी चाळ 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन, बीएमसी आणि पोलिसांचा निर्णय

Corona | महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच, ठाकरे सरकारचा निर्णय

Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड.