मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

मुंबईत उद्यापासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 5:02 PM

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या मुंबईसह राज्यातील (Mumbai Metro And Library) जनतेसाठी खूश खबर आहे. मुंबईत उद्यापासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली असून शाळा-कॉलेज मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत धार्मिकस्थळं उघडण्याबाबतचं मात्रं कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही (Mumbai Metro And Library).

‘अनलॉक-5’मध्ये (Unlock 5 Guidelines) सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर ग्रंथालयं सुरु करण्याची मागणी होत होती. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शाळा आणि कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच असणार आहेत.

राज्य सरकराने आज मिशन बिगीन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवर राज्य सरकार समाधानी असून कंटोन्मेंट झोन वगळता इतर भागातील व्यवहार सुरु करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे (Mumbai Metro And Library ).

“केंद्र सरकारने राज्य सरकारला शाळा सुरु करण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना राज्यातील शाळांना पालन करणे सक्तीचे आहे. शाळेने केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना न पाळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सीबीएससी आयसीएससी आणि केंद्रीय विद्यालयांना सुरु करण्यासाठी राज्याची परवानगी आवश्यक आहे”, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

काय सुरु?

  • मुंबई मेट्रो
  • ग्रंथालय
  • गार्डन, पार्क्स
  • व्यावासायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स)
  • स्थानिक आठवडा बाजार, गुरांचा बाजारालाही परवानगी
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा
  • पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि तंत्रशिक्षण, लॅबोरटरीशी संबंधितांना 15 ऑक्टोबरपासून शिक्षण संस्थेत उपस्थितत राहण्यात मुभा
  • ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे (Mumbai Metro And Library)
  • शाळेतील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी
  • उच्च शिक्षण संस्थांचं ऑनलाइन प्रशिक्षण सुरुच राहील

काय बंद?

  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद बंद
  • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

Mumbai Metro And Library

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock | येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार? राजेश टोपेंचे संकेत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.