Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, ‘या’ खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी

मुंबईतील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोरोना चाचणी करता येणार (Mumbai Private Labs Corona Test Not Need Doctor Prescription) आहे.

मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, 'या' खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी
Follow us
| Updated on: Jul 08, 2020 | 12:32 AM

मुंबई : कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी महापालिकेद्वारे सर्वस्तरावर प्रयत्न सुरु (Mumbai Private Labs Corona Test Not Need Doctor Prescription) आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखीत सल्ल्याशिवाय म्हणजे प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोरोना चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे आता मुंबईतील निर्धारित खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कोव्हिड चाचणी थेटपणे संपर्क साधून करता येणार आहे. ही चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात 17 खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी चाचणी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असणे गरजेचे होते, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र आता ही अट काढून टाकली आहे.

ज्यामुळे नागरिकांना त्यांची कोविड चाचणी सहजपणे करवून घेणे शक्य होणार आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या विभागस्तरीय ‘वॉर रुम’द्वारे बेड अलॉटमेंट करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होईल.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

खासगी लॅबमधून कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रति चाचणी 2 हजार 500 एवढे शुल्क आकारले जाणार आहे. तर वैद्यकीय चाचणीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन प्रती चाचणी रुपये 2 हजार 800 एवढे शुल्क आकारले जाईल.

तसेच जे व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत, त्यांना डिस्चार्जपूर्वी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र ही चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार (Mumbai Private Labs Corona Test Not Need Doctor Prescription) नाही.

‘या’ खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीला परवानगी 

1. Thyrocare

2. Suburban

3. HN Reliance

4. Metropolis

5. SRL

6. Infexn

7. Kokilaben

8. SRL Phadke

9. IGENETICS

10. PD Hinduja

11. Qualilife Diagnostics

12. Dr.Jariwala

13. Nanavati Hospital

14. Sunflower

15. NM MEDICAL

16. JASLOK

17. life care diagnostic

(Mumbai Private Labs Corona Test Not Need Doctor Prescription)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | आता मुंबईत चीनपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त

टाटा समुहाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी रसद, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 कोटी, 100 व्हेंटिलेटर्स, 20 रुग्णवाहिका प्रदान

साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.