फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिल्यानंतर आता हा प्रकल्प गुंडाळल्यातच जमा (Hyperloop project work stop)  आहे.

फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला
Follow us
| Updated on: Jan 25, 2020 | 11:10 AM

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेड सिग्नल दिल्यानंतर आता हा प्रकल्प गुंडाळल्यातच जमा (Hyperloop project work stop)  आहे. नुकतंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसंच PMRDA अधिकाऱ्यांच्या काल (शुक्रवार) पार पडलेल्या बैठकीत हायपरलूप प्रकल्पाची आवश्यकता नसल्यावर एकमत झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आणखी एक धक्का दिल्याचे बोललं जात (Hyperloop project work stop) आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीसांच्या महत्त्वकांक्षी हायपरलूप प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे. सध्या हायपरलूप या महागड्या प्रकल्पापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी या घडीला महत्त्वाची आहे, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा प्रकल्प जगात कुठेही झाला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ द्या. पुणे मुंबई मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प राज्याला परवडणारा नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या बाजूला हायपर लूप प्रकल्प होणार होता. पुणे ते वाशी जमिनीवर आणि पुढे वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जमिनीखाली हा प्रकल्प करण्यात येणार होता. पुणे-मुंबई जलदगतीने वाहतुकीसाठी हा प्रकल्प करण्यात येणार होता. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठीच (ट्रायल रनसाठी) जवळपास साडेतीन हजार कोटी लागणार (Hyperloop project work stop) होते.

तर दुसऱ्या टप्प्यासाठीही हजारो कोटींचा खर्च येणार होता. या प्रकल्प उभारणीसाठी तीन परदेशी कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर केले जाणार होते. पुणे-मुंबई ही दोन्ही शहरे हायपयर लूप तंत्रज्ञानाने जोडल्यास अंदाजे 14 ते 22 मिनिटात अगदी स्वप्नवत हा प्रकल्प होणार होता. मेट्रो, समृद्धी महामार्ग प्रकल्पाप्रमाणेच हायपरलूपही फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प होता. मात्र या प्रकल्पाला ब्रेक लागल्याचे बोललं जात आहे.

हायपरलूप प्रकल्प नेमका काय?

फडणवीस सरकारने घोषणा हायपरलूप प्रकल्पाची घोषणा केली होती. यामुळे मुंबईहून अवघ्या अर्ध्या तासात पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ (Hyperloop) च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर असतील. महाराष्ट्र राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ (Virgin Hyperloop ) आणि ‘डीपी वर्ल्ड’ (DP World) यांच्या कराराला मान्यता दिली होती. महत्त्वाकांक्षी असा जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होण्यापूर्वी त्याला ब्रेक लागला आहे.

हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणार आहे. मात्र हजारो तरुणांना हाय-टेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज वर्तवला जात होता.

हायपरलूप म्हणजे नेमकं काय?

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंदगतीने सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.