कंगनाने मुंबईत पाय ठेवताच बेड्या ठोका, स्वाभिमानी मुंबईकर मैदानात, थेट पोलिसात तक्रार

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यामुळे संतप्त झालेल्या एका मुंबईकराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे (Mumbiker Aditya Sarfare police complaint against Kangana Ranaut).

कंगनाने मुंबईत पाय ठेवताच बेड्या ठोका, स्वाभिमानी मुंबईकर मैदानात, थेट पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 9:02 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यामुळे संतप्त झालेल्या एका मुंबईकराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आदित्य सरफरे असं तक्रारदार मुंबईकराचे नाव आहे. “अभिनेत्री कंगना रनौतवर मुंबई विमानतळावर उतरताच तिला कोणतीही सुरक्षा न पुरवता तात्काळ अटक करण्यात यावी”, अशी मागणी आदित्य सरफरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे (Mumbiker Aditya Sarfare police complaint against Kangana Ranaut).

“कंगनाने ट्विटरवर 9 ऑगस्ट रोजी मुंबईत येते, मला कोण रोखतं ते बघू, अशा शब्दात महाराष्ट्र सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. आता हा विषय राज्याचा आणि मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे कंगना मुंबई विमातळावर उतरताच तिला कोणतीही सुरक्षा न पुरवता तात्काळ अटक करण्यात यावी”, अशी मागणी आदित्य सरफरे यांनी केली आहे.

“आदित्य सरफरे यांची तक्रार सर्वप्रथम मुंबईचे अ‍ॅडिशनल कमिश्नर सुनील कोल्हे यांच्याकडे शनिवारी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गोरेगाव वनराई पोलिसांकडे ही प्रत रवाना झाली. आता ही तक्रार पोलिसांनी घेतली असून, तिच्याविरुद्ध येत्या दोन दिवसात एफआयआर नोंदवण्यात येईल”, अशी माहिती वनराई पोलिसांकडून तक्रारदारांना सांगण्यात आली आहे (Mumbiker Aditya Sarfare police complaint against Kangana Ranaut).

“कंगनाने सोशल मीडियावर मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याच्या कलमान्वये भारतीय दंड विधान IPC 499, IPC 500 आणि IPC 124 A हे कलम लावण्यात यावे. मुंबई पोलिसांची बदनामी म्हणजे कर्तव्यदक्ष नीतिमूल्यांची मानहानी आहे. त्यामुळे कंगना राणावतवर भारतीय दंड विधान अखत्यारीत निर्धारित कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी”, अशी तक्रार आदित्य सरफरे यांनी नोंदवली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.