AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाभोलकरांच्या उजव्या डोळ्याच्या वर मस्तकात गोळी मारली, कळसकरची कबुली जशीच्या तशी

डॉ वीरेंद्र तावडेने तरुणांची जुळवाजुळव कशी केली. त्यांना कसं आणि कुठे प्रशिक्षण दिलं. रेकी कशी केली, रेकी करण्यासाठी कोणी मदत केली, हत्यारं कुणी पुरवली, याबाबतची सविस्तर माहिती शरद कळसकरने न्यायवैद्यक चाचणीत दिली.

दाभोलकरांच्या उजव्या डोळ्याच्या वर मस्तकात गोळी मारली, कळसकरची कबुली जशीच्या तशी
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 6:31 PM

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकाडांतील खळबळजनक खुलासे समोर आले आहेत.  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शरद कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणी केली. यामध्ये त्याने धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपी शरद कळकसरचा कबुलीजबाब टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.

डॉ वीरेंद्र तावडेने तरुणांची जुळवाजुळव कशी केली. त्यांना कसं आणि कुठे प्रशिक्षण दिलं. रेकी कशी केली, रेकी करण्यासाठी कोणी मदत केली, हत्यारं कुणी पुरवली, याबाबतची सविस्तर माहिती शरद कळसकरने न्यायवैद्यक चाचणीत दिली. आरोपी शरद कळसकर याचा हा कबुली जबाब tv9 मराठीच्या हाती लागला आहे.

शरद कळसकरची धक्कादायक माहिती

वीरेंद्र तावडेने लोकांची जुळवाजुळव केली. 2012 मध्ये विकास पाटील नावाचा तरुण कळसकरच्या गावी गेला होता. त्या गावात तो पुढे सहा महिने राहिला होता. या काळात त्याने तरुणांना हेरून त्यांना कट्टर हिंदुत्वाकडे वळवले.

2013 मध्ये विकास पाटीलने कळसकरला वीरेंद्र तावडे यांच्याबाबत सांगितलं. ओळख करून दिली. वीरेंद्र तावडे आपल्याला औरंगाबाद येथे भेटला. त्याच्यासोबत अमित देगवेकरही भेटला. त्यांना आपल्याला हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करण्याची विनंती केली.

त्यानंतर प्रथम आपल्याला एअर गनचा सराव करायला सांगितलं. तो मी केला. जून 2013 मध्ये मला पुन्हा औरंगाबादला बोलावलं. यावेळी त्याच्यासोबत अमित देगवेकर आणि सचिन अंदुरे होते.

यावेळी तावडेने आपल्याला खऱ्या पिस्तुलाने आता प्रॅक्टिस करायची आहे, असं सांगून जंगलात नेलं आणि ट्रेनिंग दिली. ऑगस्ट 2013 मध्ये सचिन अंदुरेने मला औरंगाबादला बोलावलं. तिथून आम्ही पुण्याला आलो.

पुण्यात स्टेशनजवळ एका थिएटरजवळ भेटलो. तिथे आम्हाला तावडे भेटले. त्यांनी पुण्याचा कोडवर्ड मॅडमजी असल्याचं सांगितलं. त्याठिकाणी आणखी एक व्यक्ती आला. त्याचं नाव विक्रम भावे असल्याचं सांगितलं. भावे हा अॅडव्होकेट पुनाळेकर यांचा सहाय्यक आहे.

विक्रम भावेने आपल्या मोटर सायकलवरुन मला आणि सचिन अंदुरेला बसवून ज्या ठिकाणी डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करायची आहे, त्या ठिकाणची रेकी केली.

आम्ही 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी शिवाजी नगर बस स्टँडला पोहचलो. पूर्व नियोजित योजनेनुसार तिथे एक काळ्या रंगाची मोटरसायकल उभी होती. त्याची चावी सचिनकडे होती. त्या मोटर सायकलवरून आम्ही डॉ दाभोलकर राहत असलेल्या ठिकाणी आलो.

सव्वा सात वाजण्याच्या सुमारास डॉ दाभोलकर वॉकसाठी आले. सचिन त्यांच्या मागे गेला. त्याने तिथल्याच एक वॉक करणाऱ्या व्यक्तीला हे डॉ दाभोलकर आहेत का असं विचारलं. तो व्यक्ती हो म्हणाला.

सचिनने तेच डॉ दाभोलकर असल्याची खात्री करून घेतल्यावर मी हातात देशी कट्टा घेऊन डॉ दाभोलकर यांच्या मागे धावत गेलो. माझ्या मागे सचिनही हातात देशी कट्टा घेऊन आला.

मला डॉ वीरेंद्र तावडेने आधीच सांगितलं होतं की डॉ दाभोलकर यांच्या डोक्यात गोळी मारायची. म्हणजे ते जागीच मरतील. मी त्याप्रमाणे त्यांच्या मागून जाऊन त्यांच्या डोक्यात गोळी मारली. दुसरी गोळी मारली पण ती लागली नाही. म्हणून मग तिसरी गोळी डॉ दाभोलकर यांच्या उजव्या डोळ्याच्या वर मस्तकात मारली. यानंतर पडलेल्या डॉ दाभोलकर यांच्या पोटावर सचिन अंदुरे याने गोळी मारली.

दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर आम्ही वेगवेळ्या मार्गाने आपल्या गावी गेलो. डॉ दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर पाच दिवसांनी डॉ तावडे आम्हाला औरंगाबादला भेटले. त्यांनी आमचं अभिनंदन केले.

डॉ दाभोलकर यांची हत्या केल्यानंतर एक महिन्याने सचिन अंदुरे याने हा प्रकार सनातन संस्थेचा एक भाग असलेल्या हिंदू जनजागरण समितीचे ऋषिकेश देवडेकर याला सांगितलं.

त्यानंतर वीरेंद्र तावडे, अमित देगवेकर, सचिन अंदुरे, विकास पाटील हे नियमित आमच्या विभागात यायचे. आणि ध्यान आणि जपबाबत चर्चा करायचे.

ऋषिकेश देवडेकर हा मुरली उर्फ शिवा उर्फ किशोर नावाने ओळखला जातो. तर विकास पाटील हा निहाल नावाने ओळखला जातो.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.