बँक कर्मचारी दुर्लक्षित कोरोना योद्धे, विमा संरक्षण देण्याची मनसेची सरकारकडे मागणी

"सर्व बँक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे सलाम", असं नितीन सरदेसाई आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत (Nitin Sardesai demand insurance cover to bank employees).

बँक कर्मचारी दुर्लक्षित कोरोना योद्धे, विमा संरक्षण देण्याची मनसेची सरकारकडे मागणी
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 1:20 PM

मुंबई : “कोरोना संकंटात बँक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांदेखील कोरोना संसर्गाचा धोका आहे. तरीदेखील ते धोका पत्करुन आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. या कोरोना योद्ध्यांनादेखील सरकारने इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच विम्याचे संरक्षण द्यावे”, अशी मागणी मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे (Nitin Sardesai demand insurance cover to bank employees).

नितीन सरदेसाई यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर बँक कर्मचाऱ्यांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. “सर्व बँक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे सलाम”, असं नितीन सरदेसाई आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत (Nitin Sardesai demand insurance cover to bank employees).

हेही वाचा : आदित्य ठाकरेंचा पुढाकार, गोव्याची मजा कोकणात, बीच शॅक्सने स्थानिकांना 80 टक्के रोजगार

“कोरोना महामारीच्या या काळात पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, अग्निशमन दल कोरोनाशी लढत आहेत. हे सगळेच आपल्यासाठी माणसाच्या रुपातील देवदूतच आहेत. यांच्याबरोबरच एक वर्ग असा आहे जो शांतपणे जनतेची सेवा करत आहे. तो म्हणजे बँकेचा कर्मचारी वर्ग”, असं नितीन सरदेसाई म्हणाले.

“लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांचे सगळेच व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीतही जनतेला पैशांची चणचण भासू नये म्हणून बँकांचे व्यवहार मात्र अव्याहतपणे सुरु आहेत”, असं नितीन सरदेसाई म्हणाले.

“लोकांचे पगार खात्यात जमा करणे, सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जारी केलेले आदेश अथवा नियम अंमलात आणणे, लोकांचे इतर आर्थिक व्यवहार सुरु ठेवणे ही सगळी कामे बँक कर्मचारी करीतच आहेत”, असंदेखील ते म्हणाले.

“प्रवासाची सुविधा नसतानाही बँकेचे कर्मचारी कामावर येत आहेत. दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तसेच नोटा हाताळण्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा धोका आहे. पण हा धोका पत्करुन हे ‘कोरोना योद्धे’ आपली कर्तव्य चोख पार पाडत आहेत”, असं नितीन सरदेसाई म्हणाले.

हेही वाचा : Palkhi Sohala 2020 | देहूनगरीत भक्तिरसाचा सोहळा, संत तुकोबांच्या पादुकांचे ऐतिहासिक नीरा स्नान संपन्न

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.