Ganesh Visarjan | राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, थेट समुद्रात विसर्जन करण्यास मनाई

राज्यात आज (23 ऑगस्ट) दुपारनंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. (One and half day Ganesh Visarjan BMC Guidelines) 

Ganesh Visarjan | राज्यात दीड दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, थेट समुद्रात विसर्जन करण्यास मनाई
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 9:26 AM

मुंबई : यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज (23 ऑगस्ट) दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. (One and half day Ganesh Visarjan BMC Guidelines)

यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडणार आहे. मुंबईसह राज्यात शनिवारी गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन करण्यात आले. अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे काल आगमन झाले. त्यानंतर आज दुपारनंतर दीड दिवस पूर्ण झाल्यानंतर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाईल.

गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींचे हे थेट समुद्रात करता येणार नाही. तसेच पालिकेकडून जागोजागी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्याशिवाय गणेश भक्तांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान भाविकांनी शक्यतो घरातच बादली किंवा ड्रममध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशीही सूचना पालिकेकडून देण्यात आली आहे. (One and half day Ganesh Visarjan BMC Guidelines)

मुंबई महापालिकेकडून गणेश विसर्जनसाठी नियमावली

• घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

• मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

• नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.

• नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 170 कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.

• महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत 7 ते 8 गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.

• प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सिल्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

• मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

• महापालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करुन फिरती विसर्जन स्‍थळे (mobile spots on wheel) निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा.

• यंदा गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

• विसर्जना दरम्‍यान सामाजिक अंतर (social distancing), मास्‍क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात येत आहे. (One and half day Ganesh Visarjan BMC Guidelines)

संबंधित बातम्या : 

Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास ‘नो एन्ट्री’, मुंबई पालिकेकडून नियमावली जारी

पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...