AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide).

... तर मी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी माफी मागेन : संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 12, 2020 | 2:11 PM

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Sanjay Raut on Sushant Singh Suicide). मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील असंही नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल, तर मग केंद्रातलं सरकार पडेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. तेच या प्रकरणाचा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल, तर ईश्वर त्यांना समबुद्धी देवो.”

“या प्रकरणाला न्याय मिळो. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करतंय.”

“काय करायंचंय ते आम्ही आणि सुशांतचं कुटुंब पाहू. माध्यमांनी बोलायचं काही काम नाही. काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे”

संजय राऊत म्हणाले, “राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्यात सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. विरोधकांना हे सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस आहे. त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या भाजत राहावं. आम्हाला खूप कामं आहेत.”

“आम्हाला 50/100 नोटीस येत राहतात. बाकी मला काहीच माहिती नाहीये. पार्थ पवारची भूमिका वेगळी नाहीये. आम्ही सगळे एकत्र आहोत. अशावेळी राजकारण केलं जातंय. ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे,” असंही ते म्हणाले.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

युरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

Rhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

Sanjay Raut on Sushant Singh Suicide

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.