AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी प्रवेशाचं वृत्त खोटं : शिवसेना आमदार सुनील शिंदे

शिवसेनेचे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने सुनील शिंदे ((Sunil Shinde) ) नाराज असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी प्रवेशाचं वृत्त खोटं : शिवसेना आमदार सुनील शिंदे
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 5:02 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्याबदल्यात शिवसेनेचे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र आमदार सुनील शिंदे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने सुनील शिंदे ((Sunil Shinde) ) नाराज असल्याची चर्चा आहे. सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सुनील शिंदे यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी त्याला इन्कार दिला.

2014 मध्ये वरळी विधानसभेसाठी सुनील शिंदे विरुद्ध सचिन अहिर यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुनील शिंदे यांनी बाजी मारली होती. आता सचिन अहिर यांना शिवसेनेने प्रवेश दिल्यामुळे सुनील शिंदे यांच्या तिकीटावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

या विधानसभेत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होते. सचिन अहिर यांनी तीनवेळा विजय मिळवला होता. मात्र आता सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे, राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात बडा चेहरा नाही. त्याचाच फायदा  सुनील शिंदे यांना मिळू शकतो.

कोण आहेत सुनील शिंदे?

  • 2007 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं
  • 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार
  • 2014 च्या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळवली, सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली
  • 2015 ला उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी

संबंधित बातम्या 

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?   

राष्ट्रवादी फोडणार नाही, शिवसेना वाढवणार : सचिन अहिर  

कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.