नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करुनही त्यांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने आंदोलन केलं.

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन
Follow us
| Updated on: Sep 12, 2020 | 2:50 PM

मुंबई : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करुनही त्यांना जामीन मिळाल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. भाजपतर्फे पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. (Shivsainiks beating a retd Indian Navy officer)

यावेळी IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी प्रवीण दरेकर आणि आंदोलकांची भेट घेतली. आवश्यक त्या कलमांचा समाविष्ट करण्याचं आश्वासन पोलिसांकडून नांगरे पाटील यांनी दिलं. प्रवीण दरेकर आणि नांगरे पाटील यांची चर्चा सुरु असतानाच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दरेकरांना फोन आला. त्यांनीही आंदोलकांच्या मागणीची दखल घेतली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

“निवृत्त नौदल अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली. शिवसैनिकांनी घरात घुसून मारहाण केली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चव्हाट्यावर आणलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलं.

त्यानंतर पोलीस अॅक्टिव्ह झाले, त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं, पण लगेच सोडून दिलं. पोलिसांनी जी कलमं लावणं अपेक्षित होतं, ती लावली नाही. ती लावावी यासाठी आम्ही आज आंदोलन केलं. पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन केलं. पोलिसांनी कलमं वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. जर ही कलमं लावली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करु”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

IPS विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

दरम्यान, भाजपच्या या आंदोलनानंतर सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढून, कलमे वाढवण्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेऊन, आवश्यक कारवाई करु, असं आश्वासन दिलं.

नांगरे पाटील म्हणाले, “जी मारहाण झाली आहे, त्याबाबत कलम 325 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींना अटक करण्यात आली. मात्र हे कलम जामीनास पात्र असल्याने, आरोपींना जामीन मंजूर झाला. आंदोलकांकडून कलम 326 आणि 452 ही कलमं लावण्याची मागणी आहे. 326 कमल हे धारदार हत्यारांनी वार आणि 452 कलम घरात घुसून मारहाण यासाठी आहे. 452 हे कलम वाढवण्यात येईल”

(Shivsainiks beating a retd Indian Navy officer)

संबंधित बातम्या 

कांदिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण, अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.