AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी टीव्ही9 मराठीच्या हाती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) शिवसेनेने अद्याप कोणतीही यादी (Shivsena Candidate list) जाहीर केलेली नसतानाच रविवारी (29 सप्टेंबर) एबी फॉर्मचे (Shivsena AB Form) वाटप केले.

शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी टीव्ही9 मराठीच्या हाती
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 9:14 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) शिवसेनेची संभाव्य उमेदवारांची यादी (Shivsena Candidate list) टीव्ही9 मराठीच्या हाती लागली आहे. रविवारी (29 सप्टेंबर) शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहिर करण्याआधीच एबी फॉर्मचं (Shivsena AB Form) वाटप केलं. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केलं. त्यामुळे शिवसेनेच्या या संभाव्य उमेदवारांची नावं समोर आली आहेत. शिवसेना-भाजप युती (Shivsena BJP Alliance) जाहीर होण्याआधीच शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळातही बरिच चर्चा सुरू आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत रविवारी एबी फॉर्म देण्यात आले. ज्या मतदारसंघाबाबत युतीत अगदी स्पष्टता आहे आणि पक्षांतर्गतही ज्या जागांवर काहीही वाद नाही, अशा बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेनेने एबी फॉर्मचं वाटप केलं.

Shivsena Arjun Khotkar Uddhav Thackeray

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना एबी फॉर्म देताना उध्दव ठाकरे.

Akola Balapur Nitin Deshmukh

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांना एबी फॉर्म देताना उध्दव ठाकरे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिल्याने शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. कोल्हापूरमध्ये 8 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी राखीव मतदारसंघातून आमदार गौतम चाबुकस्वार यांना, तर हिंगोलीतील कळमनुरीतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा लढवणार

रत्नागिरी – उदय सामंत गुहागर – भास्कर जाधव दापोली – योगेश कदम चिपळूण – सदानंद चव्हाण राजापूर – राजन साळवी

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) निश्चित झालेला नाही. यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना (BJP Shivsena seat sharing formula) सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. मात्र भाजपकडून शिवसेनेला कमी जागांचा प्रस्ताव असल्याने फॉर्म्युला ठरण्यास वेळ लागत असल्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे. परंतु सर्वांना खुश करण्यासाठी तितक्या जागाच नसतील, तर काय करायचं, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युती तोडण्याचा मार्ग  देखील काढला जाऊ शकतो, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.

सत्ता आणि जागा 50-50 : संजय राऊत

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) यांच्यातील जागा आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोरच ठरला आहे. त्यानुसार जागा आणि सत्तेमध्ये 50-50 टक्के वाटा सेना-भाजपचा (Shiv Sena BJP) असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.