Tv9 इम्पॅक्ट : ‘त्या’ व्हिडीओनंतर मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्मवर ‘सरबत’बंदी
मुंबई : कुर्ल्यातील स्टॉल धारकाच्या लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर विकल्या जाणाऱ्या खुल्या पेयांवर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली असून, यात लिंबू पाणी, काला खट्टा, ऑरेंज ज्युस आणि इतर खुल्या पेयांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने 13 मे 2013 साली खुल्या पेयांचा […]
मुंबई : कुर्ल्यातील स्टॉल धारकाच्या लिंबू पाणी अस्वच्छपणे बनवण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची बातमी टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकावर विकल्या जाणाऱ्या खुल्या पेयांवर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली असून, यात लिंबू पाणी, काला खट्टा, ऑरेंज ज्युस आणि इतर खुल्या पेयांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने 13 मे 2013 साली खुल्या पेयांचा विक्रीला परवानगी दिली होती. आता फक्त सीलबंद पेयच विकता येतील असा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर उष्णतेने हैराण झालेले मुंबईकर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॉलमध्ये निंबू सरबत, कोकम असे पेय पितात. पण हे पेय कसे बनवले जातात त्याचा एक व्हिडीओ समोर आला. कुर्ला स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 7 वरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुन्हा कधीही निंबू सरबत पिण्याची इच्छा होणार नाही.
तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आयुष्यात कधीही रेल्वे स्टेशनवर लिंबू पाणी पिणार नाही
कुर्ला स्टेशनवर एका प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर टाकला होता. रेल्वेकडून याची तातडीने दखल घेण्यात आली. रेल्वे अधिकारी स्टॉलवर गेले आणि त्यांनी पाण्याची तपासणी केली. स्टॉल चालकाचा दोष आढळून आल्यामुळे स्टॉल तातडीने बंद करण्यात आला आहे.
मुंबईतील जवळपास सर्व स्टेशनवर असे स्टॉल आहेत. त्यामुळे इतर स्टॉलवरही रेल्वेकडून आता तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्टॉलधारकांवर रेल्वेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या सतर्क प्रवाशामुळे ही घटना समोर आली.
VIDEO : प्रवाशांना घाणेरड्या पाण्यात तयार केलेलं लिंबू सरबत, कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 7 वरील व्हिडीओनंतर पोलिसांकडून तातडीने स्टॉल बंद pic.twitter.com/qNrhyMD73i
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2019