सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता
घाऊक बाजारात आज (19 ऑक्टोबर) 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे (Vegetable prices decline in Mumbai APMC market).
नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. तसेच मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात गेल्या दोन दिवसांपासून आवक कमी असल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र सर्वसामान्य आता सुटकेचा श्वास घेऊ शकतात. घाऊक बाजारात आज (19 ऑक्टोबर) 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे (Vegetable prices decline in Mumbai APMC market).
भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे, नाशिक, अहमदनगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे, अशी माहिती भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली (Vegetable prices decline in Mumbai APMC market).
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. पण आज जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
दरम्यान, आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे ती दिवाळीपर्यंत तशीच राहणार, अशी माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
भाज्यांचे आजचे दर किती?
काकडी : 20 ते 25 रु किलो मिरची : 35 ते 45 रु किलो शिमला मिरची : 40 ते 60 रु किलो भेंडी : 25 ते 35 रु किलो गवार : 50 ते 60 रु किलो कोबी : 20 ते 30 रु किलो फरसबी : 45 ते 55 रु किलो विकला जात असून शेवगा : 50 ते 60 रु किलो रताळे : 25 ते 30 रु किलो कोथिंबीर : 40 ते 60 जुडी मेथी : 15 ते 25 जुडी वाटाणा : 100 ते 140 रु किलो टोमॅटो : 20 ते 30 रु किलो
हेही वाचा : गावकरी पलिकडे, फडणवीस अलिकडे, पूल वाहून गेल्याने शेतकरी पोहत-पोहत फडणवीसांच्या भेटीला