AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तरच मुंबई लोकल सुरु करु : रेल्वेमंत्री पियुष गोयल

मुंबईसह देशभरात बसेस सुरु झाल्या आहेत. लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या व विमानेदेखील सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.

...तरच मुंबई लोकल सुरु करु : रेल्वेमंत्री पियुष गोयल
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 11:32 AM

नवी दिल्ली : मागील सात महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल बंद आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जून-जुलैच्या दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामध्ये हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात सिनेमागृहदेखील सुरु करण्याची शक्यता आहे. (We will decide on starting the Mumbai local train after the state government sends the proposal says Piyush Goyal)

मुंबईसह देशभरात बसेस सुरु झाल्या आहेत. लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या व विमानेदेखील सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता प्रत्येक मुंबईकराला मुंबई लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गोयल म्हणाले की, राज्य सरकारच्या मागणीनंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.

गोयल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे जर आमच्याकडे प्रस्तावच आला नाही तर मुंबई लोकल सुरु करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्य सरकार आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल तेव्हाच आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ.

पियुष गोयल यांच्या माहितीनंतर सर्वांना प्रश्न पडला आहे की, महाराष्ट्र सरकार मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव कधी पाठवणार.

संबंधित बातम्या

…तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल

Special Report | 1 नोव्हेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार? TIFRचा अहवाल काय सांगतो?

(We will decide on starting the Mumbai local train after the state government sends the proposal says Piyush Goyal)

भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.