मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय?
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढलं आहे. (Reason Behind Mumbai Corona Patient Increase Again)
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढलं आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वेगाने दुप्पट होऊ लागले आहेत. तर रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. (Reason Behind Mumbai Corona Patient Increase Again)
गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी 67 दिवस होता.
गेल्या महिन्याभरात मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता 2000 हून अधिक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबईत रुग्णवाढीची कारणे
1) मुंबईत अनलॉक सुरू झाल्याने मोठया प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. 2) सर्व बाजारपेठा मंडई मार्केट सुरू केल्याने लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 3) गणेश उत्सवाचा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करा असं सांगण्यात आलं होतं. पण अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळाली. 4) सुरुवातीला कोरोनाबाबत असणारी भीती आता कमी झाली आहे. त्यामुळे लोकं बिनधास्त बाहेर विनामास्क सुद्धा फिरत आहेत. 5) पालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंघन नागरिकांकडून केलं जात आहे.
मुंबईतील कोरोना वाढती रुग्ण संख्या
तारीख – रुग्ण संख्या – मृत्यू
13 सप्टेंबर – 2081 – 41 12 सप्टेंबर – 2321 – 42 11 सप्टेंबर – 2172 – 44 10 सप्टेंबर – 2371 – 38 9 सप्टेंबर – 2227 – 43
तर दुसरीकडे मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. तसेच मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.20 टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत बेडची संख्या ही कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे ही लक्ष द्यावं, असं मत विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केलं आहे. (Reason Behind Mumbai Corona Patient Increase Again)
संबंधित बातम्या :
महिनाभरापूर्वी कोरोनामुक्त, भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण
काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर