दमोह : जमिनीखाली मिळालेला खजिना शोधण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. हा खजिना मिळवण्यासाठी अघोरी पुजा करण्याची अनेक उदाहरणे आहेत. आपले नियमित काम करताना तब्बल 136 वर्षे जुना असलेला खजिना मिळाल्यास तुम्ही काय कराल? नक्कीच हा खजिना मिळाल्याचा आनंद अनेकांना होईल. काही जणांना लालच येईल अन् तो खजिना आपल्या स्वत:च्या भंडाऱ्यात जमा करतील. परंतु मध्य प्रदेशात मजुराला हा खजिना मिळाला अन् त्यानंतर त्याने जे काही केले, त्यामुळे त्याल सॅल्यूट करावे, असे तुम्हाला वाटेल.
नेमके काय घडले
मध्य प्रदेशातील दमोहमधील ही घटना आहे. या ठिकाणी मजूर असलेल्या हाले अहिरवार याला एका घरात खोदण्याचे काम करत होता. हे काम करताना त्याला जमिनीच्या आतून 240 चांदीची नाणी सापडली. या नाण्यांवर 1886 सालचा शिक्का मारण्यात आला होता, ज्यावरून ही नाणी सुमारे 136 वर्षे जमिनीखाली लपवून ठेवण्यात आली होती.
नाणी घेऊन गेला घरी
घराच्या उत्खननात अहिरवार याला 240 ब्रिटिश कार्पेट नाणी सापडली, तेव्हा त्याचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्याला ही नाणी लपवून ठेवायची होती. हा खजिना सापडला तेव्हा कोणीही नव्हते. मग तो नाणी घेऊन घरी आला. पण त्याला रात्रभर त्याला झोप लागली नाही. रात्रभर तो अस्वस्थ होता. मग त्या नाण्यांबाबत त्याने उचललेले पाऊल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
काय केले मजुराने
शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्थानिक पोलीस ठाण्यात गेला आणि खजिना पोलिसांच्या हवाली केला. रोजंदारी काम करणाऱ्या हाले अहिरवार यांच्या या प्रामाणिक पाऊलाचे पोलिसांनी कौतुक केले आहे. आता 136 वर्षे जुन्या राजशाही काळातील नाण्यांबद्दल शोध घेण्याचे काम प्रयत्न सुरू झाले. यासंदर्भातील माहिती तज्ज्ञांना देण्यात आली.
काय म्हणतात पोलीस
पोलिसांनी सांगितले की, हाले अहिरवार मंगळवारी एका घरात खांबासाठी खड्डा खोदत होते. त्यावेळी त्यांना ही नाणी सापडली. त्यांनी ते पोलीस ठाण्यात जमा केली. एवढी जुनी नाणी पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले, असे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय राजपूत यांनी सांगितले.
हे ही वाचा
Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय