Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार

शौकतने सोहन लालचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावर काही कमेंट्स लिहिली, असे आरोपींचे म्हणणे आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर सर्व आरोपींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शौकतचे अपहरण केले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे शौकतकडे स्वतःचा स्मार्टफोनही नव्हता.

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 6:59 PM

नवी दिल्ली : दिल्लीत इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी एकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना दिल्लीतील उत्तम नगर भागात घडली आहे. याठिकाणी काही अल्पवयीन मुलांनी व परिसरातील बदमाशांनी मिळून एका व्यक्तीची चाकूने 10 वार करून हत्या केली. मृत युवकाने या हत्या प्रकरणातील आरोपीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यावर काही कमेंट्स लिहिल्याची प्राथमिक माहिती आहे. शौकत असे मयत युवकाचे नाव आहे.

यानंतर परिसरातील काही गुंडांनी या युवकाचे अपहरण केले आणि त्याला एका फ्लॅटमध्ये नेऊन त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळून काढला. या प्रकरणातील खुनाचा आरोपी सोहनलाल हा या भागातील सराईत गुन्हेगार सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शौकतने आरोपीचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता

शौकतने सोहन लालचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्यावर काही कमेंट्स लिहिली, असे आरोपींचे म्हणणे आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर सर्व आरोपींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शौकतचे अपहरण केले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे शौकतकडे स्वतःचा स्मार्टफोनही नव्हता. तो नेहमी भाऊ आणि मित्रांचे फोन घेऊन सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर रील काढत असे.

रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता शौकत

26-27 डिसेंबरच्या मध्यरात्री, पोलिसांना एक पीसीआर कॉल आला की एक व्यक्ती सुप्रीम मॉडेल स्कूल, उत्तम नगरजवळ बेशुद्ध पडली आहे. जेव्हा दिल्ली पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा शौकत नावाचा एक व्यक्ती तिथे पडला होता, त्याला महिंदरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला डीडीयू हॉस्पिटलमध्ये रेफर केले. मात्र जीडी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वी शौकतचा मृत्यू झाला होता.

शौकतच्या शरीरावर जखमा होत्या

शौकतवर आईस्क्रीम तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीक्ष्ण चाकूने अनेक वार केल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याच्या शरीरावर 8 ते 10 जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. शौकतच्या कुटुंबीयांनी परिसरातील गुंड आणि गुन्हेगार सोहनलालवर आरोप केले होते. पोलिसांनी तपास सुरू केला असता हत्येतील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सोहनलाल अद्याप फरार आहे. सोहनलाल यांच्यावर आरोप आहे की तो अनेकदा परिसरात दादागिरी करत असे. तो लोकांसोबत मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचा. सोहनलाल हा पोलिसांचा खबरीही असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सोहनलालचा शोध घेत आहेत. (17 year old boy murdered in Delhi from Insta Post)

इतर बातम्या

Murder: आईची अब्रू वाचवण्यासाठी वृध्दाची केली हत्या; दोन अल्पवयीन मुली गजाआड

धक्कादायक! दहिसरमधील एका प्रतिष्ठित बँकेत गोळीबार, लूटमारीच्या उद्देशानं गोळीबार?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.