वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती

यावर्षी जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 171 दहशतवादी मारले गेल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषेदत दिली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाण शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.

वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये 171 दहशतवाद्यांचा खात्मा; अजूनही 168 सक्रीय दहशतवादी, पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांची माहिती
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 6:47 AM

श्रीनगर : यावर्षी जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 171 दहशतवादी मारले गेल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या वर्षी एकूण 171 दहशतवादी चकमकीमध्ये ठार झाले. त्यापैकी 19 दहशतवादी हे पाकिस्तानी तर 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. 2020 ला जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एकूण 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2021 ला एकूण 34 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दहशतवादी संघटनांच्या मोहरक्यांचा खात्मा

ते पुढे बोलताना म्हणाले की, या वर्षी जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय जवांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास सर्वच दहशतवादी गंटांच्या मोहरक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही जम्मू काश्मीर खोऱ्यात एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. त्यामधे उत्तर काश्मीरमध्ये 65, मध्य काश्मीरमध्ये 16 आणि दक्षिण काश्मीरमध्ये 87 एसे एकूण 168 सक्रीय दहशतवादी आहेत. 13 डिसेंबर रोजी झालेल्या झेवान दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पोलिसांचे दहशतवाद्यांकडे बारीक लक्ष असून, राज्यातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

अमली पादार्थ प्रकरणात 1465 जणांना अटक

दरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये सध्या अमली पदार्थ्यांच्या तस्करीचे प्रकरणे वाढले असल्याची माहिती देखील यावेळी विजय कुमार यांनी दिली. अमली पदार्थ्यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत. आतापर्यंत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात 815 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून, एकूण 1465 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

संबंधित बातम्या

Last sunset of the year 2021 : मावळतीच्या सूर्याचं रूप मोबाइमध्ये टिपत सरत्या वर्षाला निरोप, पाहा Photos

लहान मुलं कोव्हिडच्या विळख्यात, प्रत्येक जिल्हात हवं स्वतंत्र रुग्णालय, 81% भारतीयांची मागणी

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.