कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण, काश्मीरमध्ये भाजपचा जल्लोष, BJP कार्यालयामध्ये फडकवला तिरंगा

काश्मिरमध्ये कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला आज 2 वर्ष पूर्ण झालीयत. द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपने आनंदोत्सव साजरा केला.

कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण, काश्मीरमध्ये भाजपचा जल्लोष, BJP कार्यालयामध्ये फडकवला तिरंगा
BJP celebrated second anniversary of Article 370 &35 A
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 11:49 AM

श्रीनगर :  काश्मिरमध्ये कलम 370 (Article 370) हटविण्याच्या निर्णयाला आज 2 वर्ष पूर्ण झालीयत. द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपने आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नाचून गाऊन आजच्या दिवशी आनंद साजरा केला. भाजप कार्यालयात तिरंगा झेंडाही फडकविण्यात आला.

भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी ‘भारत माता की जय’, ‘नरेंद्र मोदी झिंदाबाद’, ‘अमित शहा झिंदाबाद’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या सरकारने दोन वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने कश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं, असं तरुण चुग म्हणाले.

भाजप कार्यालयात तिरंगा फडकवला

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि जम्मू कश्मीरचे भाजप प्रभारी तरुण चुग यांनी आज 5 ऑगस्टच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवला. तरुण चुग यांनी आजचा दिवस कश्मीरच्या जनतेसाठी खास असल्याचं सांगत कश्मीरच्या नावावर मुफ्ती आणि अब्दुल्ला परिवाराने आतापर्यंत केवळ राजकारणच केलं, अशी टीका केली.

काश्मिरमध्ये आता विकासाला पोषण वातावरण, पण याचमुळे काही लोकांना दु:ख

केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर विभाजनवादी आणि दहशतवादी शक्तींना मोठा झटका बसलाय. काश्मीरमध्ये आता विकास आणि प्रगतीला पोषक वातावरण निर्माण झालंय. ज्यामुळे काही लोकं नाराज आहेत, असा टोला तरुण चुग यांनी लगावला. तसंच गुपकार गठबंधनला त्यांनी गुपकार गैंग म्हणत गुपकारमधील नेत्यांवर त्यांनी टीका केली.

श्रीनगरमध्ये आजच्या कार्यक्रमावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना चुग म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी बॅकफूटला गेले आहेत. लोकांना दहशतवादापासून खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. राष्ट्रविरोधी विचारांची लोकंही आता विकासाविषयी बोलत आहेत. आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीसुविधांमध्येही पहिल्यापेक्षा आता जास्त सकारातामक फरक दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ :

(2 years Completed decision to remove Article 370 Kashmir BJP Worker Tiranga at the BJP office)

हे ही वाचा :

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.