Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI News on 2000 Note : दोन हजारांच्या नोटेसाठी भारतीयांचा जुगाड! हे दुकानदार झाले मालामाल

RBI News on 2000 Note : 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्याची घोषणा होताच, बाजारात कमिशन एजंटचा सुळसुळाट वाढला आहे, तर ही नोट खपविण्यासाठी नागरिकांनी कल्पनेचे असे घोडे पिटाळले आहेत.

RBI News on 2000 Note : दोन हजारांच्या नोटेसाठी भारतीयांचा जुगाड! हे दुकानदार झाले मालामाल
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट माघारी घेण्याचा निर्णय जाहीर केला. 19 मे रोजी, शुक्रवारी संध्याकाळी ही घोषणा झाली. घोषणेच्या दुसऱ्या दिवशी हळूहळू सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी या गुलाबी नोटा बाहेर काढायला सुरुवात केली. पण मोठ्या संख्येने असे पण लोक आहेत, ज्यांच्याकडे दोन हजारांची नोटच नाही. 2000 रुपयांची नोट (2000 Rupees Note) माघारी बोलविण्याची घोषणा होताच, बाजारात कमिशन एजंटचा सुळसुळाट वाढला आहे, तर ही नोट खपविण्यासाठी नागरिकांनी कल्पनेचे असे घोडे पिटाळले आहेत.

सुरस कथा गेल्या एक वर्षांपासून अनेक नागरिकांनी दोन हजार रुपयांची नोटच पाहिलेले नाही. आरबीआयने या नोटांची छपाई बंद केली होती. कित्येक महिन्यांपासून ही नोट बाजारातून गायब होती. गायब झालेल्या या नोटा साठेबाजांनी दाबून ठेवल्या होत्या. या नोटांचे सुरस किस्से आता काही दिवसांतच समोर येतील. गेल्या नोटबंदीवेळी बाद झालेल्या नोटा एक वर्षानंतरही नदी, नाल्या काठी, अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्या होत्या.

इथं खपविल्या जात आहेत नोटा दैनिक भास्करने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, 2000 रुपयांच्या ज्यांच्याकडे कमी नोटा आहेत. किंवा ज्यांना या नोटांचा भार हलका करायचा आहेत, ती मंडळी या नोटा पेट्रोल पंप, सराफा बाजार आणि दारुच्या दुकानावर खपवत आहेत. सर्वाधिक नोटा या दारुच्या दुकानदारांकडेच जात आहे. जे लोक पूर्वी महागडी दारु खरेदी करत नव्हते. ते आता महागडी दारु, परदेशी दारु या नोटा देऊन विकत घेत आहेत. त्यामुळे दारु दुकानदार हैराण झाले आहेत. त्यांचा व्यवसाय गेल्या दोन रात्रीत अचानक जोरदार वाढल्याने दुकानदारांचे वारे न्यारे झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

सराफा बाजारातही झुंबड गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरु आहे. त्यातच दोन हजारांच्या नोटा खर्च करायच्या असल्याने अनेकांनी सराफा बाजारात या नोटा खपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच शनिवार-रविवार आल्याने सराफा बाजारात एकच गर्दी उसळली आहे. सराफा पण हुशार झाले आहेत. या नोटा खपविण्यासाठी ग्राहक येत असल्याने त्यांनी दोन हजारांच्या नोटेसाठी काही कमिशन लावल्याची चर्चा आहे.

कमीशन एजंट पेट्रोल पंप मालक पूर्वी नोट घेण्यास नकार देत होते. पण या विषयीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने ते नोट स्वीकारत आहेत. पण सर्वाधिक नोटांचा खप हा दारुचे गुत्ते, वाईन शॉप येथे होत असून त्यानंतर सराफा बाजारात नोट खपत आहेत. पण अनेक ठिकाणी कमिशन एजंटचा सुळसुळाट झाला असून एका दोन हजारांच्या नोटेमागे ते 100-200 रुपये कमिशन घेत असल्याचे भास्करने वृत्तात म्हटले आहे. साठेबाजांनी या नोटा कमिशन एजंटला दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील नोटांचे बंडल कमी झाले आहेत.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.