बापरे…बुलेट ट्रेनच्या निर्मितीला दररोज इतकं सिमेंट लागतं ? ज्याने 10 मजल्याच्या तब्बल….

चीननंतर भारतीय सिमेंटचे मार्केट सर्वात दुसऱ्या क्रमांकाचे ( दरसाल 425 मेट्रीक टन उत्पादन ) तर चीनचे सिमेंटचे उत्पादन दरसाल 2,400 मेट्रीक टन इतके प्रचंड आहे. बुलेट ट्रेन निर्मितीमध्ये चीन सध्या महासत्ता आहे.

बापरे...बुलेट ट्रेनच्या निर्मितीला दररोज इतकं सिमेंट लागतं ? ज्याने 10 मजल्याच्या तब्बल....
Mumbai-Ahmedabad bullet trainImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 6:03 PM

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ( Mumbai-Ahmedabad bullet train ) ट्रेनचे बांधकाम वेगाने सुरु आहे. भारताचा हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या 508 किमी लांबीच्या प्रकल्पावर 12 स्थानकं, 24 नदी पुल, 8 डोंगरातील बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा असा मेगा प्रोजेक्ट आकाराला येत आहे. या प्रकल्पामुळे देशातील बांधकाम उद्योग, रोजगार आणि कौशल्य विकासाला जोरदार चालना मिळत आहे. नॅशलन हायस्पीड रेल कॉरीडॉर जपानच्या मदतीने हा प्रकल्प बांधीत आहे. या प्रकल्पाला गुजरात आणि महाराष्ट्रात दररोज 20,000 क्यूबिक मीटर सिमेंट कॉंक्रीटचा वापर केला जात आहे. या सिमेंटमधून 10 मजल्याच्या आठ इमारतीची निर्मिती होऊ शकते इतकं सिमेंट या मार्गासाठी वापरले जात आहे. त्यामुळे देशातील सिमेंट उद्योगालाही चालना मिळाली आहे.

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरु आहे. महाराष्ट्रातील कामांना कोरोनानंतर खरी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबईतील बीकेसी येथून या बुलेट ट्रेनचे सुरुवातीचे अंडग्राऊंड स्थानक तयार होत आहे, तसेच बीकेसी ते शिळफाटा असा 20 किमी भुयारी मार्गा खोदला जात आहे. या भुयारी मार्गापैकी सात किमीचा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील समुद्राखालील मार्ग असणार आहे. या मेगा प्रोजेक्टसाठी उच्च गुणवत्तेच्या बांधकाम तंत्राचा वापर केला जात आहे. या मार्गासाठी दररोज 20,000 क्युबिक मीटर सिमेंटचा वापर केला जात आहे. या मार्गासाठी आतापर्यंत 78 लाख क्यूबिक मीटर सिमेंट कॉंक्रीटचा वापर केला जात आहे.

20,000 कामगार दररोज काम करतात

आता पर्यंत 13 लाख मोठ्या ट्रांझिट मिक्सरांद्वारे सुमारे 78 लाख क्यूबिक मीटर कॉंक्रीटींगचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सुमारे 20,000 कामगारांच्या मेहनतीमुळे बुलेट ट्रेनचे अशा प्रकारचे हे काम करणे शक्य झाले आहे. त्यामुळे रोजगाराला चालना मिळाली आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी योजनेला पूर्ण करताना कॉरिडोरसह विशेष पद्धतीने डिझाईन आणि निर्मित केलेले 65 कॉंक्रीट बॅचिंग प्लांट्स बनविले आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 ते अडीच तासांत कापता येणार आहे. गुजरातच्या हद्दीत बिलिमोरा ते सुरत या 35 किमी अंतराच्या मार्गावर डिसेंबर 2026 मध्ये बुलेट ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके असून तीन डेपो देखील बांधले जात आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.