Year Ender : 2024मधील 10 घटना, ज्याने जग…; A पासून Z पर्यंत काय काय घडलं?

2024 हे वर्ष अनेक महत्त्वाच्या घटनांनी भरलेले होते. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेचे राष्ट्रपतीपदी पुनरागमन, भारतातील लोकसभा निवडणुकीतील भाजपचा अपयश, तिरुपती लाडू वाद, आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरण, बांगलादेशातील आंदोलन आणि सीरियातील सत्तांतर यासारख्या घटनांनी हे वर्ष ऐतिहासिक बनले.

Year Ender : 2024मधील 10 घटना, ज्याने जग...; A पासून Z पर्यंत काय काय घडलं?
shaikh hasinaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 11:29 PM

2024मध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. व्यक्तीच नव्हे तर जगासाठीही हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. केवळ भारतातच नव्हे तर या वर्षी जगात अनेक घटना घडल्या आहेत. इतिहासात नोंद केल्या जाईल अशा घटना घडल्या आहेत. काही सुखद घटना होत्या, तर काही जगाला हादरवणाऱ्या घटना होत्या. अयोध्येत राम मंदिर निर्माण होणं असो, लेबनानमधील पेजर अटॅक असो की डोनाल्ड ट्रम्प यांची वापसी असो अशा अनेक महत्त्वाच्या घटनांनी 2024 वर्ष हे भरून गेलं होतं.

2024मधील अनेक घटना संस्मरणीय आहेत. इतिहास बदलवणाऱ्या आहेत. तर काही घटना इतिहासात काळीमा फासणाऱ्या आहेत. भारतातही अशा काही घटना घडल्या. जगातही घडल्या. याच वर्षी कुणाची आर्थिक भरभराट झाली. तर कुणाला जगातून एक्झिट घ्यावी लागले. ज्या लोकांनी देशांचं सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत योगदान दिलं अशांनी जगाचा निरोप घेतला. तर काहींचं जाणं धक्कादायक होतं. 2024मधील या घटनांचाच घेतलेला हा मागोवा.

राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा

2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद मिटला. दोन्ही समाजाने कोर्टाचा निवाडा मान्य केला. त्यानंतर राम मंदिराची बांधणीही झाली आणि 22 जानेवारी 2024मध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापनाही झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य यजमान होते. या कार्यक्रमासाठी जगभरातील बड्या हस्तींना बोलावण्यात आलं होतं. भारत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला. आता मंदिर प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण होणार असल्याने अयोध्येत महत्त्वाचा कार्यक्रम पार पडेल.

डोनाल्ड ट्रंप आले

2024मध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून डोनाल्ड ट्रम्प परत आले. इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये ट्रम्प यांना 295 आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांना 226 मते मिळाली. 20 जानेवारी 2025मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती बनणार आहेत. 2020च्या तुलनेत ट्रम्प यांनी तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली. या निवडणुकीत त्यांना तरुणांनी मनापासून साथ दिली. इन्कम टॅक्स आणि स्थलांतराचा मुद्दा या निवडणुकीसाठी गेमचेंजर ठरला.

अयोध्येत भाजपचा पराभव

भारतात लोकसभेचा निकाल लागला. 4 जून रोजी हे निकाल हाती आले. भाजपला बहुमताचा आकडा मिळाला नाही. पण भाजपने मित्र पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. 400 पारचा नारा लावणाऱ्या भाजपला या निवडणुकीत अवघ्या 240 जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात तर भाजपला 80 पैकी फक्त 37 जागा मिळाल्या. फक्त दोन सीट मित्र पक्षांना मिळाल्या.

ज्या अयोध्येत राम मंदिर बनलं त्याचं श्रेय घेण्यास भाजपने जराही कसूर सोडली नाही. भाजपने मंदिर प्रतिष्ठापनेचा मोठा इव्हेंट केला. मंदिराच्या माध्यमातून हिंदू मते एकगठ्ठा करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्यते पराभव पत्करावा लागला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यंनी भाजपचे लल्लू सिंह यांचा 50 हजार मतांनी पराभव केला.

तिरुपती लाडू वाद

याच वर्षात आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडू प्रकरण गाजले. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. या लाडूत भेसळ असल्याचं उघड झालं. जनावराची चरबी आणि माशांच्या तेलापासून हे लाडू तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हे प्रकरण थेट माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यामुळे देशभरातील भाविकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

टीडीपी सरकारने जून 2024मध्ये सीनिअर आयएएस अधिकारी जे. श्यामला राव यांना तिरुपती देवस्थानमच्या नव्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्त केलं. त्यांनी प्रसादच्या क्वालिटीची चौकशी करण्याचे आदेश दिले.

आरजी कर मेडिकल कॉलेज

ऑगस्ट 2024 मध्ये कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाची झोप उडवली. या प्रकरणी आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तत्काली प्रिन्सिपल संदीप घोष याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

या घटनेनंतर केवळ कोलकात्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये प्रचंड प्रमाणात निदर्शने झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. 11 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली.

बांगलादेश विद्यार्थी आंदोलन

बांगलादेशात 1971च्या बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्यांना सरकारी नोकरीत 30 टक्के आरक्षण दिलं जात होतं. त्याच्या विरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन हळूहळू वाढलं आणि त्याने व्यापक स्वरुप घेतलं. या आंदोलना दरम्यान जोरदार हिंसा घडली. जाळपोळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर राष्ट्रपतींच्या कार्यालयात आंदोलक घुसले. त्यामुळे बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं. शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या होत्या.

दुसरीकडे बांगलादेशात मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार बनवण्यात आलं. मात्र, बांगलादेशातील धुसफूस अजूनही सुरू आहे. मोहम्मद यूनुस यांना बांगलादेशचा गाडा अद्याप व्यवस्थित हाकता आलेला नाही. 2025च्या अखेरीपर्यंत किंवा 2026मध्ये बांगलादेशात पुन्हा निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सीरियात सत्तांतर

सीरियात गेल्या काही काळापासून यादवी सुरू आहे. राष्ट्रपती बशर अल असद यांच्याविरोधात सीरियात अनेक ग्रुप लढाई लढत होते. अखेर या बंडाचा भडका उडाला. अखेर बंडखोरांनी 27 नोव्हेंबर रोजी शहरावर कब्जा मिळवला. तसेच आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्य गट हयात तहरीर अल-शाम यांनी बशल अल असद यांना देश सोडून जाण्यास मजबूर केलं.

असद यांच्या जाण्यानंतर दमिश्क आणि होम्स सहीत सीरियातील अनेक शहरात उत्सव साजरा केला गेला. सीरियात असद कुटुंब गेल्या 53 वर्षापासून सत्तेत आहे. विद्रोही गटाच्या विरोधात लढण्यासाठी असद सरकार रशिया आणि ईराणवर अवलंबून होती. तर बंडखोरांना तुर्कीचं समर्थन होतं.

लेबनानमध्ये पेजर ब्लास्ट

लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या अतिरेक्यांना मारण्यासाठी इस्रायलने पेजरचा शस्त्रासारखा वापर केला. यात बॅटरी सोबत स्फोटके लावण्यात आली होती. योग्य वेळ येताच त्याचा स्फोट करण्यात आला. हिजबुल्लाहचे अतिरेकी बऱ्याच वर्षापासून या पेजरचा वापर करत होते. पण यात असं काही असेल याचा त्यांना मागमूसही लागला नाही.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते बनले. सुमारे 10 वर्षानंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले. काँग्रेसलाही 10 वर्षानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवता आलं. काँग्रेसकडे मधल्या काळात लोकसभेत 10 टक्के मते नव्हती. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करू शकली नव्हती.

HIV चे इंजेक्शन

एचआयव्हीची व्हॅक्सीन शोधण्याचा रेकॉर्डही याच वर्षाकडे जातो. या इंजेक्शनला लेनकापाविर नाव देण्यता आलं आहे. फेज 3 च्या ट्रायलवेळी हे इंजेक्शन 96 टक्के परिणामकारक ठरल्याचं पाहायला मिळालं.

कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड.