VIDEO: गरबा खेळताना 21 वर्षाच्या मुलाबरोबर जे झालं, त्याने सगळेच हळहळले
विधिलिखत आणि नशिबापुढे कोणी जाऊ शकत नाही
मुंबई: सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाचा (Navratri) उत्साह आहे. देशभरात विविध ठिकाणी गरबा, (Garba) दांडीया (Dandiya) रासच्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मागची दोन वर्ष कोरोनामुळे सर्वसामान्यांना उत्सवाचा आनंद घेता आला नव्हता. ती कमतरता यावर्षी भरुन काढली जातेय. रात्रीच्यावेळी मोठ्या मैदानापासून ते थेट गल्लीबोळात गरबा, दांडीया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. याच गरबा-दांडीयाच्या कार्यक्रमादरम्यान काही दुर्देवी घटना घडल्या आहेत.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईत एका युवकाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. अशीच घटना गुजरातच्या आनंद जिल्ह्यात घडली आहे. एका 21 वर्षाच्या मुलाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गरब्याच्या तालावर रिंगणामध्ये फेर धरलेला असताना या युवक अचानक जमिनीवर कोसळला.
त्याचवेळी काळीज हेलावून सोडणारी घटना घडली
विरेंद्र सिंह रमेश भाई राजपूत असं मृत युवकाच नाव आहे. रविवारी ही दुर्देवी घटना घडली. सगळेच गरब्याच्या रंगात होते. उत्साह टिपेला पोहोचला होता. सर्वांनी गरब्यावर ताल धरला होता. त्याचवेळी काळीज हेलावून सोडणारी ही दुर्देवी घटना घडली.
Anand :
गरबा खेलते खेलते एक शख्स की मौत।
तारापुर में आती शिवशक्ति सोसायटी में गरबा आयोजित किया गया था।
युवक को अस्पताल ले जाया गया लेकिन तब तक देरी हो चुकी थी।
वजह दिल का दौरा पड़ने से मौत बताई जा रही है। pic.twitter.com/GlUA1irveA
— Janak Dave (@dave_janak) October 2, 2022
त्याने प्रतिसाद दिला नाही
गरब्यासाठी जमलेल्या लोकांनी विरेंद्र सिंहला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. गरबास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हे सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यावर रेकॉर्ड केला. जम्मूमध्ये एका 20 वर्षीय कलाकाराचा लाइव्ह शो दरम्यान स्टेजवर मृत्यू झाला.