गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अवघ्या 4 तासांत 26 रुग्णांचा मृत्यू! उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी

गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंगळवारी पहाटे 2 ते सकाळी 6 या 4 तासात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अवघ्या 4 तासांत 26 रुग्णांचा मृत्यू! उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी
गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:59 PM

पणजी : गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंगळवारी पहाटे 2 ते सकाळी 6 या 4 तासात 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. या प्रकाराने गोव्यात एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. तसंच या प्रकरणाचं सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणीही राणे यांनी केलीय. (26 Corona patients died in Goa Medical College and Hospital in 4 hours on Tuesday)

या धक्कादायक प्रकारानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालायाचा दौरा केला. मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोविड वार्डात त्याचा सप्लाय यामध्ये काही वेळ लागल्यामुळे कोरोना रुग्णांना त्रास झाला असावा, असा अंदाज सावंत यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं सावंत यांनी आवर्जुन सांगितलं.

सोमवारपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा कमी होता, ही बाब विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मान्य केली आहे. या घटनेमागील कारणांचा तपास घेण्यासाठी याचा तपास उच्च न्यायालयामार्फत करावा अशी मागणी त्यांनी केलीय. उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केल्यास यंत्रणा सुधारण्यास मदत होईल, असंही राणे म्हणालेत.

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या : 

कोरोनावरील उपचारादरम्यान ‘या’ औषधाचा वापर नको, WHO चा डॉक्टरांना महत्वाचा सल्ला

लसच नव्हे, हाही आहे कोरोनावर रामबाण इलाज ! प. बंगालच्या 12 वीच्या मुलीचा दावा

26 Corona patients died in Goa Medical College and Hospital in 4 hours on Tuesday

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.