Uddhav Thackeray in Thane Live : मुख्यमंत्र्यांच्या गडात उद्धव ठाकरे

| Updated on: Jan 27, 2023 | 6:16 AM

26th January Republic Day 2023 (प्रजासत्ताक दिन) Live Updates : देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो.

Uddhav Thackeray in Thane Live : मुख्यमंत्र्यांच्या गडात उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

26th January Republic Day 2023 Live: आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. याच दिवसापासून भारतात संविधान लागू झालं होतं.  26 जानेवारी भारतासाठी राष्ट्रीय पर्व आहे. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात प्रथमच उद्धव ठाकरे पोहचले आहे. अर्थात या ठिकाणी शक्तीप्रदर्शनही झाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jan 2023 09:51 PM (IST)

    दादर पूर्वमध्ये एका उंच इमारतीत आग

    आरए रेसीडेन्सी इमारतीत आग

    सर्वात उंच टॉवरमधील मजल्याला लागली आग

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

    अग्निसमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थली दाखल

  • 26 Jan 2023 09:35 PM (IST)

    अंबरनाथ : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

    अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडच्या म्हात्रे गोट फार्ममधील घटना

    मंदा मुकने असं मृतक महिलेचे नाव

    जखमीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार

    हिललाईन पोलिसांनी मृतदेह घेतला ताब्यात

    शवविच्छेदनासाठी मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल

  • 26 Jan 2023 07:46 PM (IST)

    बिहारमधील पूर्णियातील मधुबनी सिपाही टोला परिसरात फडकावण्यात आला पाकिस्तानी ध्वज

    पोलिसांना माहिती मिळताच पोहोचले संशयिताच्या घरी

    पोलिसांकडून काढण्यात आला पाकिस्तानी ध्वज

    याप्रकरणी पूर्णियाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून कारवाई होणार- पवन चौधरी, एसएचओ मधुबनी

  • 26 Jan 2023 07:43 PM (IST)

    तुळजापूर येथे पठाण पिक्चरचे पोस्टर व बॅनर फाडले

    पठाण फिल्मला तुळजापूर येथे विरोध

    हिंदुराष्ट्र सेनेने पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करीत फाडले पोस्टर

    पठाण फिल्मचा तुळजापूर येथील जवाहर टॉकीज येथे होता शो

    मात्र पूर्वीच फाडले पोस्टर बॅनर

  • 26 Jan 2023 07:14 PM (IST)

    पुण्यात सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा

    टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने उद्यापासून बंदचा निर्णय

    पुणे ग्रामीणमधील सर्व पंप उद्यापासून बेमुदत काळासाठी राहणार बंद

    शहरातील एमएनजीएलची सेवा मात्र नेहमीप्रमाणे राहणार सुरू

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच सीएनजी पंप बेमुदत काळासाठी बंद

    पेट्रोल डिझेल असोसिएशन पदाधिकाऱ्यांची माहिती

  • 26 Jan 2023 06:21 PM (IST)

    दिल्ली | 16 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी चार तरुणांना अटक

    16 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी चार तरुणांना अटक

    हर्षित, विक्रम, विपिन, पंकज अशी अटक केलेल्या तरुणांची नावं

    शाहबाद डेअरी परिसरात नाल्यातून सापडला मृतदेह

    तरुणांकडून घेतलेले 18 हजार रुपये परत न दिल्याने केली हत्या

    आणखी तीन आरोपी फरार

    दिल्ली पोलिसांकडून पुढील तपास सुरू

  • 26 Jan 2023 06:18 PM (IST)

    Entertainment News Live: तेलुगू अभिनेता शारवानंदचा साखरपुडा, RRR फेम रामचरणचीही हजेरी

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शारवानंदने केला साखरपुडा

    शारवानंदने रक्षिताशी केला साखरपुडा

    रक्षिता ही आंध्रप्रदेशातील एका राजकीय कुटुंबाशी संबंधित, वाचा सविस्तर..

    View this post on Instagram

    A post shared by Sharwanand (@imsharwanand)

  • 26 Jan 2023 05:05 PM (IST)

    कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले अर्ज

    सर्व इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मागवले अर्ज

    काँग्रेस कार्यालयात उद्या दुपारपर्यंत इच्छुकांना अर्ज देण्याच्या सूचना

    कसबा विधानसभेसाठी काँग्रेसचेच सहा ते सात उमेदवार इच्छुक असल्याची माहिती

  • 26 Jan 2023 04:51 PM (IST)

    सत्यजित तांबे-राजीव देशमुख यांची भेट

    सत्यजित तांबे यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांची भेट

    बंद दाराआड सत्यजित तांबे व माजी आमदार राजीव देशमुख यांची चर्चा

    सकाळी शुभांगी पाटील यांनीदेखील राजीव देशमुख यांची भेट घेतली

    शुभांगी पाटील यांच्या भेटीदरम्यान शेकडो कार्यकर्ते होते उपस्थित

  • 26 Jan 2023 04:27 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनी कैद्यांना अनोखी भेट

    प्रजासत्ताक दिनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून 32 कैदी मुक्त केले

    या कैद्यांना शिक्षेच्या कालावधीत 34% सूट मिळाली

    महाराष्ट्रातील जेलमधून 180 कैद्यांना सोडण्यात आले आहे

  • 26 Jan 2023 04:12 PM (IST)

    Entertainment News Live | रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या ‘पठाण’ला IMDb वर मिळाली कमी रेटिंग

    पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ‘पठाण’ला IMDb वर कमी रेटिंग

    या चित्रपटाला मिळाली  7.1 IMDb रेटिंग, वाचा सविस्तर

  • 26 Jan 2023 04:10 PM (IST)

    Entertainment News Live | दीपिका पदुकोणच्या ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून थिएटरमध्ये राडा

    उत्तरप्रदेशमधल्या बरेलीमध्ये शाहरुख खानच्या‘पठाण’ या चित्रपटावरून थिएटरमध्ये जोरदार हंगामा

    ‘बेशर्म रंग’ गाण्यावरून थिएटरमध्ये गोंधळ झाल्याची माहिती, वाचा सविस्तर..

  • 26 Jan 2023 03:54 PM (IST)

    अमरावती-नागपूर महामार्गावरील नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन 

    आयआरबी टोल प्रशासन ग्रामपंचायतला इमारत कर, तसेच रस्ते व नाल्यांची सुविधा देत नसल्याचा आरोप…

    काही वेळ टोल नाक्यावर तणावाचे वातावरण…

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अखेर आंदोलन मागे

  • 26 Jan 2023 03:04 PM (IST)

    पुण्यात स्वारगेट परिसरात 3 दुकानांना भीषण आग

    पुणे : स्वारगेट येथे भंगार दुकान, रद्दी डेपो आणि गादी घराला भीषण आग,

    दुकानात काम सुरू असताना आगीची ठिणगी पडून आग लागल्याची माहिती,

    अग्निशमन दलाच्या सहा बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू,

    आगीत कुठलीही जीवित हानी नाही, तिन्ही दुकाने आगीत जळून खाक.

  • 26 Jan 2023 03:02 PM (IST)

    तळोजा कारागृहामधून 18 कैद्यांची सुटका

    नवी मुंबई : अमृत महोत्सवानिमित्त तळोजा कारागृहात असणाऱ्या कैद्यांची सुटका करण्यात आली,

    विविध गुन्ह्यामध्ये अटक असणाऱ्या कैदींची वागणूक बघून 26 जानेवारी निमित्त सुटका केली जाते,

    दरवर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त तळोजा कार्यलयातील कैद्यांची सुटका करण्यात येत असते,

    आज देखील विविध गुन्ह्यांमध्ये अटक असणाऱ्या 18 कैदी आज सोडण्यात आले आहेत.

  • 26 Jan 2023 02:56 PM (IST)

    मुंबईच्या साकीनाका परिसरातील झोपडपट्टीत लागली आग

    मुंबई – 3 नंबर खाड़ीच्या आसपास असलेल्या झोपड्यांना आग,

    फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना , पोलीस घटनास्थळी दाखल,

    परिसरात दहशतीचं वातावरण.

  • 26 Jan 2023 02:48 PM (IST)

    पुण्यात स्वारगेट येथे भंगार दुकानाला मोठी आग

    अग्निशमन दलाचे दोन वाहने घटनास्थळी दाखल

    आग्नी शमन दलाच्या सहा वाहने दाखल

    3 दुकाने आगीच्या भक्षस्थानी

    अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू

  • 26 Jan 2023 02:42 PM (IST)

    सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात

    ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे दाखल

    मोठ्या प्रमाणात जैन बांधव उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला उपस्थित

    जैन समाजाच्या मुनींचे उद्धव ठाकरे यांनी घेतले दर्शन

  • 26 Jan 2023 02:35 PM (IST)

    माथेरानच्या घाटात एर्टीगा कारचा अपघात

    चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात

    मुंबईहून आलेले दोन पर्यटक कारमध्ये होते

    सुदैवाने पर्यटकांना फारशी इजा नाही, गाडीचं मोठं नुकसान

    पोलीस आणि ग्रामस्थांकडून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

  • 26 Jan 2023 01:47 PM (IST)

    Pune Live- बागेश्वर बाबांविरोधात पुण्यात तक्रार

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप असणारा बागेश्वर बाबा या दोघांनी एकमेकांना चॅलेंज दिलंय

    -पण याच वादातून श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची अन नरेंद्र दाभोलकर प्रमाणे गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय

    -आता याप्रकरणी पिंपरी चिंचवड मधील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय

    -श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी शाम यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे

  • 26 Jan 2023 12:12 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुण तरुणींची शनिवारवाड्यावर गर्दी

    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुण तरुणींची शनिवारवाड्यावर गर्दी

    सुट्टीच्या निमित्ताने शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी झाली आहे

    चिमुकलेही शाळेतील झेंडावंदनंतर शनिवारवाड्यावर गर्दी करतायेत

    हातावर गालावर तिरंगा काढत लहान मुलं आनंद साजरा करतायेत

  • 26 Jan 2023 12:05 PM (IST)

    खराब हवामानातही एअर फोर्सच्या थरारक कसरती

    आज दिल्लीमध्ये फार चांगलं हवामान नाहीय. दृश्यमानता फार कमी आहे. मात्र या स्थितीतही इंडियन एअर फोर्सचे फायटर पायलट थरारक हवाई कसरती सादर करत आहेत. इंडियन एअर फोर्सची फायटर विमान वेगवेगळ्या फॉर्मेशन्सच प्रदर्शन करतायत.

  • 26 Jan 2023 11:54 AM (IST)

    बाईकवरील थरारक स्टंट सुरु

    अंगावर रोमांच निर्माण करणारे सर्वसामन्यांना चकीत करणारे थरारक स्टंटस सुरु आहेत. हे स्टंट पाहिल्यानंतर तुमच्या तोंडून आपसूक कौतुकाचे शब्द बाहेर पडतील.

  • 26 Jan 2023 11:52 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुण-तरुणींची शनिवार वाड्यावर गर्दी

    पुणे : सुट्टीच्या निमित्ताने शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी झाली आहे,

    74 प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून शाळकरी आणि महाविद्यालय तरुणांचे पाऊलं शनिवार वाड्याकडे.

  • 26 Jan 2023 11:41 AM (IST)

    कर्तव्य पथावरील कार्यक्रम LIVE पाहा

    डोळ्याचा पारणं फेडणारा कर्तव्य पथावरील शानदार कार्यक्रम LIVE पाहा.

  • 26 Jan 2023 11:29 AM (IST)

    महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठ

    दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ काय असणार? याची सर्वानाच उत्सुक्ता असते. यंदा कर्तव्य पथावर महाराष्ट्राने चित्ररथाच्या माध्यमतातून साडेतीन शक्तीपीठाच दर्शन घडवलं. चित्ररथाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथात देवीजवळ असणारे गोंधळी सुद्धा होते.

  • 26 Jan 2023 11:23 AM (IST)

    गुजरातच्या चित्ररथातून कुठला संदेश?

    गुजरातने चित्ररथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सौरऊर्जा वापरण्याचा सल्ला दिला. गुजरातमध्ये एका गावात सध्या संपूर्ण कारभार सौर ऊर्जेवर सुरु आहे. गुजरातने एका सुंदर गाण्याच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा संदेश दिला.

  • 26 Jan 2023 11:16 AM (IST)

    कर्तव्य पथावर चित्ररथ

    कर्तव्य पथावर भारताच्या संस्कृतीच दर्शन घडवणारे चित्ररथ यायला सुरुवात झाली आहे. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेच दर्शन या चित्ररथांमधून होतय. कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथ दिसतील. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 17 चित्ररथ असतील. त्याशिवाय वेगवेगळी मंत्रालय आणि विभागांचे सहा चित्ररथ असतील.

  • 26 Jan 2023 11:11 AM (IST)

    नौदलाच्या तुकडीत 9 अग्निवीर

    लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली 144 युवा नौसैनिकांच्या तुकडीने कर्तव्य पथावर मार्च केलं. इतिहासात पहिल्यांदाच मार्च करणाऱ्या तुकडीमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष अग्निवीर सहभागी झाले होते.

  • 26 Jan 2023 11:04 AM (IST)

    शौर्याला सलाम, कर्तव्य पथावरील कार्यक्रम LIVE पाहा

    लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वेगवेगळ्या तुकड्यांच कर्तव्य पथावर दिमाखदार संचलन सुरु आहे. कर्तव्य पथावर भारताचं शौर्य, पराक्रमाच दर्शन घडतय. या कार्यक्रमात भारताची अत्याधुनिक शस्त्रास्त्र दाखवली जात आहेत. परेडमध्ये DRDO सह सैन्य दलांनी चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीच दर्शन घडवलं.

  • 26 Jan 2023 10:47 AM (IST)

    कर्तव्य पथावर सैन्य शक्तीच LIVE प्रदर्शन

    कर्तव्य पथावर भारताच्या सैन्य शक्तीच दर्शन घडतय. यात मेड इन इंडिया शस्त्रास्त्र, मिसाइल्स, रडार्स यांचा समावेश आहे.

  • 26 Jan 2023 10:35 AM (IST)

    कर्तव्य पथावर सुरु झाली परेड

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी कर्तव्य पथावर दाखल झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या भव्य कार्यक्रमाला परेडने सुरुवात झाली आहे.

  • 26 Jan 2023 10:29 AM (IST)

    राष्ट्रपती भवनातून प्रस्थान

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निघाले आहेत.

  • 26 Jan 2023 10:15 AM (IST)

    जळगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण

    74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपल्याकडे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    शिल्प कला,नैसर्गिक साधन संपत्ती, कृषी ,औद्योगिक, पर्यटन वैचारिक मंथनाची प्रगल्भ परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राची भविष्यातही अशीच वाटचाल होत राहावी यासाठी सर्व मिळून विकासाच्या कल्पक आणि नाविन्य पूर्ण संकल्प राबवण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात केले आहे.

  • 26 Jan 2023 10:13 AM (IST)

    पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना वाहिली आदरांजली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियलवर जाऊन शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली.

  • 26 Jan 2023 10:03 AM (IST)

    J&K: श्रीनगरमध्ये लाल चौकवर फडकला तिरंगा

    आज 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर येथे लाल चौकच्या क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवण्यात आला.

  • 26 Jan 2023 10:00 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    चंद्रकांत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

    चंद्रकांत पाटील म्हणाले…

    बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटना पुढची 1000 वर्षे बदलावी लागणार नाही अशी आहे

    सर्वांना समान अधिकार घटनेने दिले

    पंतप्रधानांच्या विरोधातही सामान्य माणूस बोलू शकतो

    आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना काल राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाला त्यांचे अभिनंदन

    बोगस मतदानाच्या माध्यमातून बोगस लोकांना निवडणूक द्यायचे आणि दादागिरी करायची हे आता संपणार आहे

  • 26 Jan 2023 09:47 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

    शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

    1. सर्वप्रथम मी देशाच्या प्रजासत्ताकाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

    2. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो.

    3. माझ्या शासनाने नुकताच मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जोडले गेले आहेत.

    ४. मुंबई तसेच नागपूर, पुणे, ठाणे भागातील मेट्रो मार्गांची कामे दर्जेदार आणि जलद गतीने करण्यात येत आहेत. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच मेट्रो मार्ग दोन अ आणि मेट्रो मार्ग सात वरील दुसरा टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मेट्रो मार्ग एक, दोन अ आणि सात हे परस्पर एकमेकांशी जोडले गेल्यामुळे मुंबईला पहिले मेट्रो नेटवर्क मिळाले आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प (एमटीएचएल), कोस्टल रोड यासह मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे.

    ५. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाटात नवीन मार्गिका बांधत आहोत. वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ठाणे खाडी प्रकल्प, पुणे शहराभोवतीचा चक्राकार वळण मार्ग प्रकल्प (Ring Road), ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, वर्सोवा – विरार सागरी मार्ग प्रकल्प, रायगड जिल्हा ते सिंधुदूर्ग जिल्हा सागरी महामार्ग, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प अशा विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.

    ६. युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंचाहत्तर हजार रिक्त पदे भरत असून नुकतीच याची सुरुवातही करण्यात आली आहे. राज्यातील अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत.

    ७. विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये डिसेंबर 2022 मध्ये शेहचाळीस हजार एकशे चौपन उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला.

    ८. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दहा हजार रुपये वाढ केली असून आता ते वीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे. पाच हजार चारशे सहा स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ होणार आहे.

    ९. आणिबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा देखील सन्मान / गौरव करण्याबाबतची योजना पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली आहे.

    १०. माझ्या शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग’ या नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे.

  • 26 Jan 2023 09:40 AM (IST)

    राहुल गांधींकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “एकता, सद्भावना, समानता आणि संप्रभुता संविधानाचे आधारस्तंभ आणि आपल्या प्रजासत्ताकाचा आत्मा आहे. माझ्या सर्व प्रिय भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा” असं राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटलय.

  • 26 Jan 2023 09:25 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

    आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन

    मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

    मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांची उपस्थिती

  • 26 Jan 2023 09:21 AM (IST)

    शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

    मुंबईत शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झालं.

  • 26 Jan 2023 09:03 AM (IST)

    सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला ध्वजारोहणाचा सोहळा

    सोलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते पार पडला ध्वजारोहण सोहळा,

    जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला ध्वजारोहण सोहळा,

    ध्वजारोहणानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

  • 26 Jan 2023 08:52 AM (IST)

    खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा

    अमरावतीमधील गंगा सावित्री निवासस्थानी झेंडावंदन..

    राणा दाम्पत्याने सीआरपीएफच्या जवानासोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन…

    सुरक्षा रक्षकांना वाटली जिलेबी…

  • 26 Jan 2023 08:47 AM (IST)

    नागपुरात RSS मुख्यालयात ध्वजारोहण

    आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील संघ मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. RSS नागपूरचे महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं.

  • 26 Jan 2023 08:43 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल….
    पंचवटी चौकातील उड्डानपूल आज बंद….
    मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश…
    रस्त्यावर विद्यार्थी, लहान मुले पालकांची गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाचा निर्णय…
  • 26 Jan 2023 08:40 AM (IST)

    जवळचा मित्र इस्रायलकडून भारताला शुभेच्छा

    भारताचा जवळचा मित्र असलेल्या इस्रायली दूतावासाने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 26 Jan 2023 08:32 AM (IST)

    वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण

    आज 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं.

  • 26 Jan 2023 08:31 AM (IST)

    PM मोदींकड़ून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया” असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलय.

  • 26 Jan 2023 08:27 AM (IST)

    कर्तव्य पथावर दिसणार 23 चित्ररथ

    आज कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथ दिसतील. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेच दर्शन या चित्ररथांमधून होईल. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 17 चित्ररथ असतील. त्याशिवाय वेगवेगळी मंत्रालय आणि विभागांचे सहा चित्ररथ असतील.

  • 26 Jan 2023 08:17 AM (IST)

    विधान भवनात देखील ध्वजारोहण करण्यात आला आहे

    विधान भवनात देखील ध्वजारोहण करण्यात आला आहे

    ध्वजारोहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे

  • 26 Jan 2023 08:14 AM (IST)

    Republic day Live- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल….

    पंचवटी चौकातील उड्डानपूल आज बंद….

    मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश…

    रस्त्यावर विद्यार्थी, लहान मुले पालकांची गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाचा निर्णय…

  • 26 Jan 2023 08:02 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालये रंगली

    -प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालये रंगली

    -जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा कार्यालय, आदिवासी विकास भवन, पोलीस आयुक्त कार्यालय यांना आकर्षक विद्युत रोषणाई

    -इमारतींवर तिरंगा रंगात लायटिंग

    -विद्युत रोषणाईने परिसर उजळला

  • 26 Jan 2023 07:33 AM (IST)

    शिवाजी पार्क नो फ्लाइंग झोन

    26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईत कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. मुंबईत ठिकाठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. तपासणीनंतरच गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांनी आज 24 तासांसाठी शिवाजी पार्क भागाला नो फ्लाइंग झोन घोषित केलय.

  • 26 Jan 2023 07:29 AM (IST)

    दिल्लीत प्रजासत्ताक दिन परेड

    दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 26 जानेवारीला जवळपास 65,000 लोक परेड पाहतील. यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्यात येऊ शकतं. फक्त वैध पासधारक आणि तिकीट खरेदी करणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.

Published On - Jan 26,2023 7:26 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.