पाकिस्तानातून आलेले 27 कोटींचे हेरॉईन जप्त, 8 विटांमध्ये आणि दोन रिकाम्या पंपांत भरुन आले होते 3.870 किलो ड्रग्ज

सीमा सुरक्षा दलाचे जवान अमृतसर सेक्टरमध्ये गस्त घालत होते. जवानांनी यावेळी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या फेसिंगच्या पुढे सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी त्यांना तिथे काही विटा आणि रिकामे पंप पडलेले दिसले. या विटा नेहमीसारख्या दिसत नव्हत्या. जवानांनी या विटा ताब्यात घेतल्या आणि तोडण्याचा प्रयत्न केला. या विटांमधून जे निघाले ते पाहून जवानांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

पाकिस्तानातून आलेले 27 कोटींचे हेरॉईन जप्त, 8 विटांमध्ये आणि दोन रिकाम्या पंपांत भरुन आले होते 3.870 किलो ड्रग्ज
BSF seized drugsImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 6:57 PM

अमृतसर – पंजाबमध्ये एकीकडे पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांडाचे प्रकरण गाजत असतानाच, सुरक्षेकडे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (BSF soliders)एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. बीएसएफच्या जवानांनी 27 कोटींचे ड्रग्ज (27 CR heroine)जप्त केले आहे. अमृतसर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. सीमेपलिकडून पाकिस्तानातील (Pakistan Drugs Mafia)स्मगलर्सनी मोठ्या शिताफीने हे ड्रग्ज भारतात पाठवले होते. मात्र जवानांना हे ड्रग्ज पकडण्यात सफलता मिळालेली आहे. हे ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेवरुन सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया सुरु असतात, त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्यात येतो. विटांमधून ड्रग्ज पाठवण्याच्या या प्रकाराने हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

कसे सापडले ड्रग्ज

सीमा सुरक्षा दलाचे जवान अमृतसर सेक्टरमध्ये गस्त घालत होते. जवानांनी यावेळी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या फेसिंगच्या पुढे सर्च ऑपरेशन राबवले. यावेळी त्यांना तिथे काही विटा आणि रिकामे पंप पडलेले दिसले. या विटा नेहमीसारख्या दिसत नव्हत्या. जवानांनी या विटा ताब्यात घेतल्या आणि तोडण्याचा प्रयत्न केला. या विटांमधून जे निघाले ते पाहून जवानांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

विटांमध्ये होते हेरॉईन

या सगळ्या विटांमध्ये हेरॉईन भरलेले होते. जवानांनी तातडीने हा घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. त्यानंतर या परिसरात पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन करण्यात आले, मात्र त्यात काहीही हाती लागले नाही.

हे सुद्धा वाचा

8 विटा आणि दोन रिकाम्या पंपांतून तस्करी

या जवानांनी एकूण आठ विटा जप्त केल्या आहेत. त्या सगळ्या विटांमध्ये हेरॉईन भरलेले होते. त्याचबरोबर होन हलो पंपही जप्त करण्यात आले आहेत. एकूण 3.870 किलोग्रॅम ड्रग्ज यावेळी जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 27 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते आहे.

ड्रग्ज तस्करीचा हा नवा मार्ग

यापूर्वी ड्रग्जची तस्करी ही ड्रोनच्या माध्यमांतून, बाटल्या सीमापार फेकून करण्यात येत होत्या. सीमेवर असलेल्या तारांमधून पाईपद्वारेही किंवा लाकडांतून यापूर्वी तस्करी करण्यात येत होती. पहिल्यांदाच अशा प्रकारे विटांमधून ड्रग्जची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील तस्करीचे प्रकार सातत्याने वाढताना दिसतायेत, त्यामुळे सुरक्षा दलानेही सतर्कता वाढवली आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....