Supreme Court | सर्वोच्च न्यायालयात 3 महिन्यांत 3 सरन्यायाधीश; स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा असं होणार, 2027 ला पुनरावृत्ती
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होतील. त्यांच्या ठिकाणी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची नियुक्ती होईल. तेही दोन महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणार आहेत.
नवी दिल्ली : यंदा देशात एकाच वर्षात तेही फक्त तीन-चार महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाला तीन सरन्यायाधीश लाभणार आहेत. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (N. V. Ramana) यांच्याशिवाय न्यायामूर्ती उदय उमेश ललित (Uday Umesh Lalit) आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रवूड (Dhananjay Chandrawood) हेसुद्धा जुलै ते नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश होणार आहेत. यापूर्वी असं एकदा झालं होतं. याचीच पुनरावृत्ती 2027 मध्ये पाहायला मिळेल. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश होतील. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 मध्ये झाली. 1991 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान तीन वेगवेगळे सरन्यायाधीश बनविण्यात आले होते. 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर असे एकूण 18 दिवस सरन्यायाधीश बनले. न्यायमूर्ती एमएच कानिया हे सरन्यायाधीश झाले. 13 डिसेंबर 1991 ते 17 नोव्हेंबर 1992 म्हणजे 11 महिने त्यांनी ही जबाबदारी सांभाळली.
6 महिन्यांत 9 न्यायाधीश निवृत्त होणार
सेवाज्येष्ठतेच्या आधारे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला जातो. न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे ठरविण्यात आले आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही रमणा हे 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यंदा 6 महिन्यात 9 न्यायाधीश निवृत्त होणार आहेत. रमणा यांनी मे, जून आणि जुलैमध्ये नियुक्त्यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. न्यायमूर्ती ललित यांच्याकडं नियुक्त्या करण्यासाठी एक महिना शिल्लक राहील. त्यांचा कार्यकाळ दोन महिने राहणार आहे.
यापूर्वी 1991 मध्ये तीन सरन्यायाधीश
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होतील. त्यांच्या ठिकाणी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची नियुक्ती होईल. तेही दोन महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणार आहेत. यापूर्वी 1991 मध्ये न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा 24 नोव्हेंबरला निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती कमल नारायण सिंह यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. ते फक्त 17 दिवसचं सरन्यायाधीश पदावर होते. (Justice Kamal Narayan Singh accepted the post. He was the Chief Justice for only 17 days.)