Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी बोलून दाखवलेली त्यांची ही स्वप्ने अपूर्ण राहिली…

राकेश झुनझुनवाला यांनी जी तीन नावे घेतली त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही नाव होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या नवीन घरी पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करायचे होते.

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी बोलून दाखवलेली त्यांची ही स्वप्ने अपूर्ण राहिली...
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 11:49 AM

मुंबई : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज मुंबईमध्ये निधन झाले. झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 वर्षी शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांना मुंबईमधील कँडी ब्रीच रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि थोड्यावेळाने त्यांना मृत (Dead) घोषित केले. राकेश झुनझुनवाला हे सर्वात यशस्वी भारतीय गुंतवणूकदारांमध्येपैकी एक होते. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने व्यापारी जगताला मोठा धक्का बसलायं. राकेश झुनझुनवाला यांनी काही काळापूर्वी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट (Dream Project) अकासा एअरलाइन्स सुरू करून विमान वाहतूक व्यवसायात प्रवेश केला.

राकेश झुनझुनवाला यांचे विमान वाहतूक व्यवसायात उतरण्याचे स्वप्न पूर्ण

दिग्गज स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला यांचे विमान वाहतूक व्यवसायात उतरण्याचे स्वप्न पूर्ण झाले पण काही स्वप्ने अपूर्ण राहिली. राकेश झुनझुनवाला यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना आपल्या काही महत्वाची स्वप्ने बोलून दाखवली होती. राकेश झुनझुनवाला यांना त्यांच्या मुंबईत नवीन घर बांधल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांना विचारण्यात आले होते की, मुंबईत त्यांच्य़ा नवीन घराच्या पहिल्याच दिवशी ते जगातील कोणत्या तीन लोकांना जेवायला बोलवतील? यावर झुनझुनवाला यांनी खास उत्तर दिले होते.

हे सुद्धा वाचा

या तीन लोकांसोबत नव्या घरात जेवण करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले

राकेश झुनझुनवाला यांनी जी तीन नावे घेतली त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही नाव होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकन गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या नवीन घरी पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करायचे होते. राकेश झुनझुनवाला यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 2018 मध्येच निधन झाले. योगायोगाने अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. आता राकेश झुनझुनवाला यांनीही ऑगस्ट महिन्यातच जगाचा निरोप घेतला.

निवृत्त होत आवडीचे आयुष्य जगायचे स्वप्न अपूर्णच

राकेश झुनझुनवाला पुढे बोलताना म्हणाले की, शेअर ट्रेडिंगमधून निवृत्त झाल्यानंतर मला पोहायला जायचे आहे. मला नृत्य शिकायचे आहे आणि माझ्या आवडीचे आयुष्य जगायचे आहे. राकेश झुनझुनवाला नियमित योगासने करायचे. रविवारी सकाळी राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या मध्यवर्ती भागातील कँडी ब्रीच रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राकेश झुनझुनवाला यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक केली जातंय.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....