2000 Notes : आता उरले अवघे काही तास, नाहीतर गुलाबी नोटा जातील रद्दीत

2000 Notes : शु्क्रवारी दोन हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दुपारपर्यंत याविषयीचा काही तरी निर्णय येण्याची शक्यता होती. ही शक्यता आता धूसर झाली आहे. काही तासात तुम्ही जर गुलाबी नोट बदलवली नाही तर या नोटा कागदाचे तुकडे होतील.

2000 Notes : आता उरले अवघे काही तास, नाहीतर गुलाबी नोटा जातील रद्दीत
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 2:48 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केले आहे की, मुदत संपल्यानंतर 2000 रुपयांच्या ( ₹2000 notes) नोटांचे मूल्य शुन्य होईल. 30 सप्टेंबर, आज ही शेवटची तारीख आहे आणि बँकेचे कामकाज संपायला अजूनही काही अवकाश आहे. त्यामुळे तुमच्याकडे चुकून गुलाबी नोट असेल तरी ती तात्काळ बदलून घ्या. नाहीतर आरबीआयने स्पष्ट केल्याप्रमाणे दोन हजारांची ही नोट कागदाचा केवळ एक तुकडा होईल. तुम्हाला त्याचे मूल्य पण मिळणार नाही. शुक्रवारी या नोटा बदलण्यासाठी एक महिन्याचा वेळ वाढवून देण्याची चर्चा रंगली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोटा बदलण्याची मुदत वाढण्याची शक्यता होती.

असा झाला निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1,000 रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर 2,000 रुपयांची नोटी व्यवहारात सादर करण्यात आली. काळ्या धनाविरोधात कारवाईसाठी ही नोटबंदी करण्यात आली होती. 30 सप्टेंबरपर्यंत आरबीआयने नोटा बदलण्यासाठी संधी दिली होती.

हे सुद्धा वाचा

शनिवारी सुद्धा बँका सुरु

अनेकांना आज शनिवार असल्यामुळे बँका बंद असतील असे वाटत असेल. पण आज पाचवा शनिवार असल्याने बँका सुरु आहेत. त्यामुळे 2000 रुपयांच्या नोटा झटपट बदलून घ्या. थोड्या वेळासाठी ही संधी मिळत आहे. त्यानंतर तुमच्या नोटा रद्द होतील. तुम्ही एकतर या नोटा बदलवू शकता अथवा या नोटा खात्यात जमा करु शकता. नागरिकांना दोन्ही पर्यांयाचा वापर करता येईल. त्यांना एकतर नोटा बदलविता येतील. अथवा जमा करता येतील.

मुदत संपल्यानंतर काय होईल

आज गुलाबी नोटा बदलण्याची अंतिम मुदत आहे. ही मुदत संपल्यानंतर या नोटा वैध असतील. त्यांची वैधता संपणार नाही, पण त्या चलनात स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यांचे चलनातील अस्तित्व राहणार नाही. व्यवहारात त्यांचा वापर होणार नाही. पण बँका आणि आरबीआय यांच्यादरम्यान त्या वापरल्या जातील. या 2 सप्टेंबर रोजी आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. 31 जुलैपर्यंत 3.14 लाख कोटी रुपयांच्या 88 टक्के नोटा बँकेत जमा करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 3.32 लाख कोटी रुपये मूल्याच्या 2,000 रुपयांच्या नोटा (2000 rupee note) माघारी बोलावल्या होत्या. याचा अर्थ अजूनही जवळपास 7 टक्के नोटा या चलनात आहे. त्यांची आता रद्दी होईल.

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.