फडणवीस यांच्यासह 4 सीएम ब्राह्मण, दलित एकही नाही, देशाचे 30 मुख्यमंत्री कोणत्या समाजाचे ?
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर देशात ब्राह्मण मुख्यमंत्र्याची संख्या आता चार होणार आहे. ब्राह्मणानंतर ठाकूर सामाजाचे पाच मुख्यमंत्री विविध राज्याचे नेतृत्व करीत आहेत. परंतू देशातील एकाही राज्यात सध्या दलित मुख्यमंत्री नाही.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित झाल्याने देशातील राज्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या ब्राह्मण समुदायाचा दबदबा वाढला आहे. केवळ पाच टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजाचे आता देशभरात चार मुख्यमंत्री बनले आहेत. ब्राह्मणानंतर ओबीसी आणि ठाकूर समाजानंतर आता मुख्यमंत्री जादा आहेत. देशात सुमारे 7 मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत. तर 5 मुख्यमंत्री ठाकूर समाजाचे आहेत. हे आकडेवारी पाहात इतर जातींचा विचार करता आकडेवारी देखील धक्कादायक आहे. 18 टक्के लोकसंख्या असलेल्या दलित समुदायाचा एकही मुख्यमंत्री देशात नाही. याऊलट केवळ 9 टक्के लोकसंख्या असलेले 4 आदिवासी देशाचे नेतृत्व करीत आहेत. देशाचे दोन मुख्यमंत्री असेही आहेत जे जाती व्यवस्थेवर विश्वास ठेवत नसून स्वत:ला नास्तिक मानतात.
चार राज्यांचे नेतृत्व ब्राह्मणांकडे
ब्राह्मण समाजातून येणाऱ्या भजनलाल शर्मा यांना भाजपाने साल 2023 मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे देखील ब्राह्मण आहेत. विधानसभा अधिवेशनात हिमंत यांनी स्वत:ला कन्नौज कुळाचे म्हटले होते. 2021 मध्ये हिमंत यांना आसामचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली होती. बंगालच्या तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी देखील ब्राह्मण आहेत. ममता साल 2011 मध्ये प्रथम मुख्यमंत्री झाल्या. साल 2021 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली आहे. आता देवेंद्र फडणवीस सीएम बनल्यानंतर ब्राह्मण मुख्यमंत्र्यांची संख्या वाढली आहे.
नायडू आणि रेड्डी उच्चवर्णीय
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी सर्वण समाजातील आहेत. रेवंथ ज्या रेड्डी समुदायाचे आहेत तो तेलंगणात अपर कास्ट श्रेणीत समाविष्ट आहे. तेलंगणा आणि आंध्रात प्रशासन आणि राजकारणात रेड्डी समुदायाचा दबदबा आहे. याच प्रकारे चंद्राबाबू नायडू कम्मा समुदायातील असून आंध्रात हा समुदाय जनरल कॅटगरी श्रेणीत सामील आहे.
देशात एकही दलित मुख्यमंत्री नाही
साल 2022 नंतर देशात एक देखील दलित मुख्यमंत्री नाही. 2022 मध्ये कॉंग्रेसने पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या जबाबदारी सोपविली होती. सध्या देशात एकाही राज्यात दलित मुख्यमंत्री नाही.मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा सारख्या राज्यात दलित उपमुख्यमंत्री जरुर आहेत.
सीएमच्या खुर्चीवर ठाकूर समाजाचे वर्चस्व
जातीय समीकरणासाठी हे गरजेचे असल्याचे म्हटले जात होते. देशातील पाच राज्यात आताही ठाकूर समाजाचे मुख्यमंत्री आहे. यात योगी आदित्यनाथ यांचे नाव सर्वात पुढे आहे. योगी देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील याच समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे देखील ठाकूर आहेत. सुक्खू कॉंग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. मणिपूरचे एन. बीरेन सिंह देखील ठाकुर समाजाचे आहेत.या दिल्लीच्या आम पक्षाच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी देखील ठाकुर समाजाशी संबंधित आहेत.
अल्पसंख्यकांचाही दबदबा
जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला मुस्लीम समुदायाचे आहेत.भारतात मुस्लीम समाज हा अल्पसंख्यांक आहे. शिख समुदायाचे भगवंत मान देखील पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. शिख समुदाय अल्पसंख्यांक आहे. ख्रिश्चन धर्माचे कोनार्ड संगमा हे मेघालयाचे मुख्यमंत्री आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री ललदुनहोवा हे देखील ख्रिश्चन धर्म मानतात. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू बुद्धीस्ट धर्मातील आहेत.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टालिन द्रविड समुदायाचे आहे. ते नेहमी भारतातीय जातीय व्यवस्थेवर टीका करतात. स्टालिन यांनी स्वत:ला नास्तिक म्हटले आहे.त्यांचे पूत्र उदयनिधी देखील सनातन धर्मावर टीका करतात.केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन एझवा समुदायातील आहेत. केरळमध्ये हा समुदाय ओबीसी आहे. परंतू पी.विजयन जाती व्यवस्थेवर टीका करतात. जाती व्यवस्था संपावी असे त्यांचे मत आहे.
देशात चार आदिवासी मुख्यमंत्री
नागालॅंडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे अंगामी नगा जमातीतील आहेत. ही जात आदिवासी म्हटली जाते. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी देखील आदिवासी समुदायाचे आहेत. 2023 मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री झालेले विष्णुदेव सहाय देखील आदिवासी समुदायाचे आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील आदिवासी समुदायाचे आहेत. देशात बऱ्याच काळाने 4 राज्यांचे मुख्यमंत्री आदिवासी आहेत.
ओबीसी मुख्यमंत्री
कुर्मी समुदायातील नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. तर नितीश ओबीसी समुदायाचे मोठे नेते मानले जातात. गुजरातचे मुख्यमंत्री भूपिंदर पटेल देखील ओबीसी समुदायाचे आहेत. ते पटेल समुदायाचे नेते आहेत. ओबीसीच्या सैनी समुदायातील नायब सिंह सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव देखील अहीर जातीचे असून जी ओबीसीत मोडते. पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी देखील ओबीसी समाजाचे असून ते वनियार जातीचे आहेत.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा देखील ओबीसी समाजाचे आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या देखील मागास समाजातील आहेत.