ओलसरपणामुळे चक्क 42 लाखाच्या नोट्या सडल्या, ‘या’ मोठ्या बँकेतील घटना
कानपूर शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या पांडू नगर शाखेत करन्सी चेस्टमध्ये ठेवलेले लाखो रुपये सडले. ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांनी लपवून ठेवली होती. मात्र आरबीआयने जुलै महिन्याचे ऑडिट केले तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
उत्तर प्रदेश : सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका बँकेतील 42 लाख रुपयांचे चलन (Currency) पावसाच्या ओलसरपणामुळे सडल्याचे उघडकीस आले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांनी याची माहितीही दिली नाही. ही बाब उघडकीस येताच चार अधिकाऱ्यांवर कारवाई (Action) करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कानपूरमधील पंजाब नॅशनल बँके (Punjab National Bank)च्या शाखेत ही घटना घडली.
पंजाब नॅशनल बँकेतील घटना
कानपूर शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या पांडू नगर शाखेत करन्सी चेस्टमध्ये ठेवलेले लाखो रुपये सडले. ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांनी लपवून ठेवली होती. मात्र आरबीआयने जुलै महिन्याचे ऑडिट केले तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
बँकेतील चार अधिकारी निलंबित
बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाख रुपयांच्या नोटा ओल्या झाल्याने सडल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकरणात करन्सी चेस्ट इन्चार्जसह वरिष्ठ व्यवस्थापकासह चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापैकी तीन अधिकारी पीएनबीच्या पांडू नगर शाखेत बदली झालेले अधिकारी आहेत.
आरबीआयने 25 जुलै ते 29 जुलै या कालावधीत शाखेच्या चेस्ट करन्सीची तपासणी केली तेव्हा, अधिकाधिक 14 लाख 74 हजार 500 रुपये आणि किमान 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच 10 रुपयांच्या 79 बंडल आणि 20 रुपयांच्या 49 बंडलचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर पुन्हा मोजणी केली असता 42 लाख रुपयांच्या नोटा सडल्याचे आढळून आले.
बँकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणातील कारवाईवर काही लोक आणि बँक कर्मचारी संघटनेचे नेत्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वरिष्ठ व्यवस्थापक करन्सी चेस्ट देवीशंकर यांना निलंबित करण्यात आले आहे. 25 जुलै रोजी बदली झाल्यानंतर ते बँकेच्या शाखेत आले असून त्यापूर्वी ही नोट सडण्याची घटना घडली होती.
नोटांचे बॉक्स बँकेत ठेवताना निष्काळजीपणा झाला. त्या मोठ्या तिजोरीत ठेवल्या जात नव्हत्या आणि जेव्हा रोकड आली की सतत पेटीत भरून अंडरग्राऊंड ती मागे ढकलली जात होती. त्यामुळे अधिक काळ नोटा बॉक्समध्ये राहिल्याने ओलाव्यामुळे नोटा कुजल्या.