मोदी सरकारच्या शेवटच्या बजेटमधील 45 मुद्दे
Budget 2019 : मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट सादर केला. पाच लाख रुपयांपर्यंत करमुक्ती आणि शेतकऱ्यांना महिन्याला 600 रुपये थेट बँक खात्यात, हे दोन या बजेटं वैशिष्ट्य राहिले. त्याचसोबत आणखी महत्त्वाच्या घोषणा या बजेटमधून मोदी सरकारने केल्या : मोदी सरकारने देशवासियांचा विश्वास वाढवला – पियुष गोयल […]
Budget 2019 : मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा बजेट आज सादर करण्यात आला. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बजेट सादर केला. पाच लाख रुपयांपर्यंत करमुक्ती आणि शेतकऱ्यांना महिन्याला 600 रुपये थेट बँक खात्यात, हे दोन या बजेटं वैशिष्ट्य राहिले. त्याचसोबत आणखी महत्त्वाच्या घोषणा या बजेटमधून मोदी सरकारने केल्या :
- मोदी सरकारने देशवासियांचा विश्वास वाढवला – पियुष गोयल
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत – पियुष गोयल
- गेल्या 5 वर्षात सर्वाधिक विकास दर गाठला – पियुष गोयल
- देशाला वैभवाकडे नेणारं हे बजेट आहे – पियुष गोयल
- ‘कमरतोड’ महागाईची कंबर तोडली – पियुष गोयल
- महागाईचा दर आम्ही कमी केला – पियुष गोयल
- कुटुंबांचा जीवनावश्यक वस्तूंवरील खर्च कमी केला – पियुष गोयल
- भारताची अर्थव्यवस्था जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे – पियुष गोयल
- तीन राष्ट्रीयकृत बँकांवरील निर्बंध उठवण्यात आले असून, बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत आहे – पियुष गोयल
- आम्ही महागाईवर नियंत्रण ठेवले नसते, तर 40 टक्क्यांनी महागाई वाढली असती – पियुष गोयल
- फरार झालेल्या आर्थिक गुन्हेगारांच्या संपत्तीवर टाच आणली – पियुष गोयल
- आर्थिक टप्प्यांवर इच्छाशक्ती दाखवून, 3 लाख कोटींची कर्जवसुली केली – पियुष गोयल
- आयुष्मान भारतच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी लोकांना आरोग्यासंदर्भात फायदा होत आहे – पियुष गोयल
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद – पियुष गोयल
- 22 पिकांचं किमान हमीभाव वाढवलं – पियुष गोयल
- दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जाणार, सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार – पियुष गोयल
- गोमातेसाठी सरकार मागे हटणार नाही, गायींसाठी राष्ट्रीय कामधेनु योजना सुरु करणार, या योजनेसाठी 750 कोटींचा खर्च येईल – पियुष गोयल
- पशुपालन आणि मत्स्यविकासासाठीच्या कर्जात 2 टक्के व्याजाची सूट – पियुष गोयल
- वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करणार – पियुष गोयल
- ईपीएफमध्ये सरकारचा वाटा वाढणार – पियुष गोयल
- 20 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युएटीवर कर लागणार नाही – पियुष गोयल
- 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या असंघटित नोकरदारांना 7 हजार रुपये बोनस – पियुष गोयल
- मजुरांना 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार – पियुष गोयल
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा
- आपले सैनिक कठीण स्थितीत देशाचं संरक्षण करत आहेत, आम्ही त्यांच्या सुविधांचाही विचार केला आहे, हाय रिस्क जवानांचे भत्तेही वाढवले – पियुष गोयल
- वन रँक वन पेन्शनसाठी (OROP) आम्ही 35 हजार कोटी रुपये दिले – पियुष गोयल
- संरक्षण मंत्रालयाचं बजेट वाढून 3 लाख कोटी रुपये केले आहे – पियुष गोयल
- महामार्ग विकासात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे – पियुष गोयल
- प्रत्येक दिवशी 27 किलोमीटर हायवे बनत आहेत – पियुष गोयल
- देशात आता मानवरहित रेल्वे क्रॉसिंग राहिले नाहीत – पियुष गोयल
- 12 लाख कोटींचा टॅक्स जमा झाला – पियुष
- फिल्म क्षेत्रातील लोकांना चित्रिकरणाची परवानगी मिळण्यासाठी सिंगल विंडो योजना – पियुष गोयल
- करवसुली वाढली, सर्व पैसा गरिबांसाठी वापरणार – पियुष गोयल
- जीएसटी आतापर्यंतचा सर्वात क्रांतिकारी निर्णय, टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली – पियुष गोयल
- जानेवारीपर्यत एक लाख कोटींचा जीएसटी जमा – पियुष गोयल
- घर खरेदीवेळचा जीएसटी कमी करण्याचा विचार – पियुष गोयल
- नोटाबंदीमुळे 1 लाख 36 कोटींचा टॅक्स वसूल झाला – पियुष गोयल
- 18 हजार शेल कंपन्या बंद केल्या, 50 हजार कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला – पियुष गोयल
- पुढल्या 5 वर्षात एक लाख गावांना डिजीटल करणार – पियुष गोयल
- पुढल्या 8 वर्षात 10 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था होईल – पियुष गोयल
- महागाई कमी करुन, योजनांवर अधिक खर्च केला – पियुष गोयल
- मनरेगासाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद – पियुष गोयल
- करदात्यांनो धन्यवाद, तुमच्या करामुळेच देशाचा विकास होतो आहे – पियुष गोयल
- पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त – पियुष गोयल
- मोदी सरकारने करमुक्तीची मर्यादा वाढवली – पियुष गोयल