गरिबीही ज्यांना पाहून हसली, कोण आहे तो गरिबांचा मसीहा, जो दररोज करतो 5.6 कोटींचे दान?
शिव नाडर हे भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. शिव नाडर यांनी आपल्याच कंपनीतून निवृत्ती घेतल्यानंतर फाऊंडेशनची स्थापनी केली. ते दररोज करोडो रुपये दान करतात. त्यामुळे दानशूर व्यक्तींच्या यादीत त्यांना नाव आहे. त्यांची एकून संपत्ती किती जाणून घ्या.
शिव नाडर हे आयटी क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक आहेत. भारतात सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’चे संस्थापक आहेत. ज्यांनी गेल्या काही वर्षांत आयटी उद्योगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. 1976 मध्ये नाडर यांनी एचसीएलची स्थापना केली होती. अध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी त्यांनी चार दशकांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व केले आहे. आयटी क्षेत्रात नाव कमावल्यानंतर शिव नाडर यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आणि शिव नाडर फाउंडेशनची स्थापना केली.
अब्जाधीश उद्योगपती शिव नाडर यांनी किरण नाडर यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला एक मुलगी आहे, तिचे नाव त्यांनी रोशनी नाडर आहे. शिव नाडर आणि किरण शिव नाडर यांची ती एकुलती एक मुलगी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज असण्यासोबतच शिव नाडर हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही ओळखले जातात.
1945 मध्ये तामिळनाडूतील मूलीपोझी येथे शिव नाडर यांना जन्म झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ते वाढले. त्यांनी इलांगो कॉर्पोरेशन उच्च माध्यमिक विद्यालय आणि कुंभकोणमच्या टाऊन उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवीसाठी कोईम्बतूर येथील पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिव नाडर यांनी मदुराई येथील अमेरिकन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
शिव नाडर यांनी त्यांचे शिक्षण तामिळनाडूमध्ये पूर्ण केले आणि त्यांचे बहुतेक शिक्षण तामिळमध्ये घेतले, ज्यामुळे त्यांना वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत इंग्रजी बोलता येत नव्हती. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिव नाडर यांनी 1967 मध्ये वालचंद ग्रुपच्या कूपर इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
1,87,000 रुपयांच्या गुंतवणुकीसह, शिव नाडर यांनी त्यांच्या मित्रांसह दिल्लीतील त्यांच्या गॅरेजमध्ये ‘हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड’ (आता एचसीएल टेक्नॉलॉजीज म्हणून ओळखले जाते) ची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी कॅल्क्युलेटर आणि मायक्रोप्रोसेसरच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले, परंतु कालांतराने त्यांनी आयटी हार्डवेअर व्यवसायाचे आयटी फर्ममध्ये रूपांतर केले. 1980 च्या दशकात, एचसीएलने 1 दशलक्ष रुपयांचा महसूल मिळवला आणि त्याचे पहिले यश अनुभवले.
जुलै 2020 मध्ये शिव नाडर यांनी एचसीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे पद त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याकडे सोपवले. 2021 मध्ये, त्यांनी HCL च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही राजीनामा दिला आणि सध्या ते कंपनीचे धोरणात्मक सल्लागार आहेत.
शिव नाडर हे एक अव्वल उद्योगपती आहेत आणि त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘हुरुन लिस्ट’नुसार ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.14 लाख कोटी रुपये आहे. त्याच्या यशस्वी व्यवसायाशिवाय शिव नाडर हे देशातील सर्वोच्च परोपकारी लोकांपैकी एक आहेत. शिव नाडर यांनी 2022-23 मध्ये धर्मादाय कारणांसाठी वार्षिक 2,042 कोटी रुपयांच्या देणगीसह पाच वर्षांत तिसऱ्यांदा भारतातील सर्वात उदार व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम ठेवले.
‘EdelGive Hurun India Philanthropy’ यादीनुसार, शिव नाडर दररोज 5.6 कोटी रुपये दान करतात. शिव नाडर यांनी चेन्नईमध्ये ‘SSN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ ची स्थापना केली आणि अनेक शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला. त्यांनी 1994 मध्ये ‘शिव नाडर फाउंडेशन’ची स्थापना केली, जी शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात काम करते.