बाबुल सुप्रियोंचा थेट राजकीय संन्यास का?, पोस्टमध्ये मुंबईचा उल्लेख कशासाठी?; वाचा पाच कारणं!

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणालाच सोडचिठ्ठी दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. (5 reason behind Babul Supriyo Announced retirement from politics)

बाबुल सुप्रियोंचा थेट राजकीय संन्यास का?, पोस्टमध्ये मुंबईचा उल्लेख कशासाठी?; वाचा पाच कारणं!
Babul Supriyo
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 7:14 PM

नवी दिल्ली: भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणालाच सोडचिठ्ठी दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले असून बंगालच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. एखादा नेता नाराज असतो, तेव्हा तो फार फार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. पण सुप्रियो यांनी थेट राजकीय संन्यास घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुप्रियो यांनी राजकीय संन्यास घेण्यामागची कारणं काय आहेत? याचा घेतलेला हा मागोवा. (5 reason behind Babul Supriyo Announced retirement from politics)

विधानसभा निवडणुकीतील अपयश

बाबुल सुप्रियो हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री होते. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून ते सलग दोनवेळा निवडून आले आहेत. मात्र, बाबुल सुप्रियो मंत्री असताना भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणता आली नाही. एवढेच नव्हे तर ते स्वत: टोलीगंज विधानसभा मतदारसंघातून सुमारे 50 हजार मतांनी पराभूत झाले. मंत्री आणि खासदार असतानाही सुप्रियो पराभूत झाल्याने पक्षातून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना पक्षातून साईडलाईन करण्यात आले होते. म्हणूनच त्यांनी राजकारणच सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

ममता दीदींवरील पोस्ट भोवली

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकी ममता बॅनर्जी यांची पुन्हा सत्ता आली. त्यामुळे सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी सारख्या क्रूर महिलेला निवडून देऊन पश्चिम बंगालच्या जनतेने ऐतिहासिक चूक केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. एखाद्या महिलेबद्दल अनादर व्यक्त करणारी ही पोस्ट खुद्द भाजपच्या नेत्यांनाही आवडली नव्हती. त्यामुळे त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तंबीही दिली होती. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मंत्रिपद गेल्याने नाराज

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारचा विस्तार करण्यात आला. यावेळी बाबुल सुप्रियो यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे ते नाराज होते. मंत्रीपद गेल्यानंतर ते भाजपच्या कार्यक्रमातही भाग घेत नव्हते. या अस्वस्थतेतूनच त्यांनी राजीना दिल्याचं सांगितलं जातं.

नेत्यांशी वाद

पश्चिम बंगालमधील नेत्यांशी बिनसल्यानेही त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तशी कबुलीच त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे. मला केव्हाच पक्ष सोडायचा होता. बऱ्याच दिवसांपासून मनात हे घोळत होतं. आता राजकारणात राहायचं नाही, असं मनानं ठरवलं होतं. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामुळे मी प्रत्येकवेळी निर्णय मागे घेतला. आता तर काही नेत्यांशी झालेले वाद उघड झाले आहेत. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकारणात राहणं योग्य नसल्याचं वाटलं. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

2014 ते 2019मध्ये मोठं अंतर

या पोस्टमध्ये सुप्रियो यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. 2014 ते 2019 पर्यंतच्या काळात मोठं अंतर आलां आहे. 2014च्या निवडणुकीत मी एकटाच बंगालमधून लढलो होतो. आज बंगालमध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. पक्षात नवीन तरुण आणि चमकदार नेते आले आहेत. पक्षात जेवढे नवे नेते आहेत. तेवढेच जुनेही आहेत. या नवीन नेते पक्षात दीर्घकाळ राहतील यात काही शंका नाही. त्यामुळे आता मी पक्षात असल्याने आणि नसल्याने काहीच फरक पडत नाही, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे. यावरून पक्षात जुन्यांना किंमत उरली नसल्याचं स्पष्ट होत आहे. पक्षात किंमत उरली नसल्यानेही त्यांनी राजकारणाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असावा असं सांगितलं जात आहे.

मुंबईचा उल्लेख करून पोस्टची समाप्ती

सुप्रियो यांनी या पोस्टमध्ये सर्वात शेवटी मुंबईचा उल्लेख करून पोस्टची समाप्ती केली आहे. विमानात स्वामी रामदेव बाबांशी माझी चर्चा झाली. पश्चिम बंगालची निवडणूक भाजप गंभीरपणे घेत आहे. पण त्यांना एकही जागा मिळणार नाही, असं मी ऐकलं. तेव्हा खूप वाईट वाटलं. जो बंगाली श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींवर भरभरून प्रेम करतो, तो भाजपला का निवडून देऊ शकत नाही, असा विचार आला. विशेषक करून मोदीच पुढील पंतप्रधान असेल असं सर्व भारतीयांनी ठरवलेलं असताना बंगालने वेगळा विचार का करावा? असं विचार आला. त्यामुळे एक बंगाली म्हणून एक आव्हान स्वीकारलं. मी सर्वांचं ऐकलं. पण अनिश्चिततेच्या संकटाला न घाबरता… जे मनाला वाटलं… जे हृदयातून आलं तोच निर्णय घेतला. 1992 मध्ये स्टँडर्ड चार्टड बँकेची नोकरी सोडून मुंबईतून जाताना जे केलं तेच आजही केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. हे सांगताना काही काव्यात्मक ओळीतून त्यांनी त्यांची भावना नेमकेपणाने मांडली आहे. त्या ओळी अशा…

वही किया!!! मैं तो जा रहा हूँ.. हाँ, कुछ शब्द रह गए हैं.. शायद कभी कहेंगे.. आज मैं वहां नहीं हूँ या कह रहा हूँ.. मैं तो जा रहा हूँ.. (5 reason behind Babul Supriyo Announced retirement from politics)

संबंधित बातम्या:

मंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम, खासदारकीचाही राजीनामा; फेसबुकवरून घोषणा

शरद पवारांशी भेट नाही, पण दर दोन महिन्याने दिल्लीत येणार; बंगालला जाता जाता ममता बॅनर्जींची केंद्राविरोधात डरकाळी

संभाजीराजे छत्रपती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डींच्या भेटीला, रायगडावरील कामांना गती देण्याची मागणी

(5 reason behind Babul Supriyo Announced retirement from politics)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.