धक्कादायक! जेवणातून 50 लोकांना विषबाधा; कर्नाटकच्या अलाड हल्लीमधील घटना, रुग्णांची प्रकृती स्थिर

कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहसमारंभात जेवलेल्या 50 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जेवनानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

धक्कादायक! जेवणातून 50 लोकांना विषबाधा; कर्नाटकच्या अलाड हल्लीमधील घटना, रुग्णांची प्रकृती स्थिर
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 7:19 AM

शिवमोगा –  कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहसमारंभात जेवलेल्या 50 लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. जेवनानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शिवमोगा जिल्ह्यातील अलाड हल्ली गावातील ही घटना आहे.

रुग्णांची प्रकृती स्थिर 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अलाड हल्ली गावात एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल 500 लोकांनी जेवन केले. मात्र यातील 50 जणांना जेवनानंतर त्रास जाणवू लागला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयता हलवण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रुग्णांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. श्रीधर एस यांनी दिली आहे.

सीईओंची रुग्णालयाला भेट 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवमोगा जिल्हा परिषदेचे सीईओ एमएल वैशाली यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. या घटनेनंतर लग्नात बनवण्यात आलेल्या जेवनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. संबंधित रुग्णांना जेवणातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी  असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. अन्नातून विषबाधा झाल्यास पोटात दुखणे, अशक्तपणा, डोकेदुखणे , चक्कर येणे यासारखे लक्षणे दिसून येतात.

छत्तीसगडमध्येही घडली होती अशीच घटना 

नुकताच छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातून देखील असाच प्रकार समोर आला होता. तेराव्याच्या जेवनातून 49 लोकांना विषबाधा झाली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्या रुग्णालयाचे डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले, गावातच कॅम्प लावून रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. बालोद जिल्ह्यातल्या बोहारडी या गावातील ही घटना आहे. जेवनानंतर संबंधित लोकांना चकरा येणे, अशक्तपणा,  पोटात दुखणे अशी लक्षणे दिसून आली होती.

संबंधित बातम्या 

अमेरिकन शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

डायरीने उलगडले वलसाडमधील तरुणीच्या आत्महत्येचे रहस्य; ट्रेनमध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य; चेहऱ्याला काळं फासलं, मुंडण केलं नंतर आगीचा मटका घेऊन गावभर फिरवलं

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.