RSS : देशातली आरएसएसची 6 कार्यालये बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी, लखनऊमध्ये तक्रार
एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हिंदी भाषेत V 49R + J8 g नवाबगंज उत्तर प्रदेश 271304 असे लिहिले आहे. तुमच्या सहा पक्षाच्या कार्यालयावर 8 वाजता बॉम्बस्फोट होईल. तुम्हाला शक्य असल्यास, स्फोट थांबवा.
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमधील मडियाव पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमक्या देणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना मोठी असून आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ असंही त्यांनी पोलिसांनी जाहीर केलं आहे. लखनौ सोडून अन्य ठिकाणी सोमवारी रात्री 8 च्या सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर उत्तर प्रदेशातील (UP) दोन आणि कर्नाटकातील चार कार्यालयांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इतर पाच कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये धमक्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांचा वापर करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय.
सुरक्षा यंत्रणांची भंबेरी उडाली
देशात सोशल मीडियाचा वापर अधिक वाढल्यापासून अशी प्रकरणं अधिक उजेडात येत आहेत. त्या ग्रुपमधील चर्चा करणारे सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकरण उजेडात येईल. कारण आत्तापर्यंत अशा प्रकरणामधून सीसीअस असं काही बाहेर आलेलं नाही. रात्री अचानक असे मॅसेज प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांची भंबेरी उडाली. तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देशात अनेक ठिकाणी आरएसएसची कार्यालये आहेत.
तीन भाषेत धमक्या
पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, अल अन्सारी इमाम राझी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवला जात आहे. यामध्ये ग्रुपमध्ये तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ज्यात कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये धमक्या लिहिल्या होत्या. इंग्रजी भाषेत आशय लिहिला आहे.
सहा पक्षाच्या कार्यालयावर 8 वाजता बॉम्बस्फोट होईल
एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हिंदी भाषेत V 49R + J8 g नवाबगंज उत्तर प्रदेश 271304 असे लिहिले आहे. तुमच्या सहा पक्षाच्या कार्यालयावर 8 वाजता बॉम्बस्फोट होईल. तुम्हाला शक्य असल्यास, स्फोट थांबवा. नवाबगंज व्यतिरिक्त राजधानी लखनौच्या सेक्टर क्यू मध्ये असलेल्या सरस्वती विद्या मंदिराचाही उल्लेख करण्यात आला आहे. आता मॅसेज करणारे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खरी शहानिशा होईल.
हे प्रकरण उजेडात कसं आलं
व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील झाल्यानंतर, एका सदस्याने त्या ग्रुपवर वेगळ्या पद्धतीवर चर्चा केली जात आहे. त्यानंतर स्वयंसेवकाने अवध प्रांतातील एका अधिकाऱ्याला संपुर्ण माहिती दिली. या प्रकरणाची दखल घेत अवध प्रांताच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कानावर हे प्रकरण घातलं.
त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली.