ED raid: मोबाईल गेमिंग एपच्या नावाखाली लोकांच्या खात्यातून उडवायचा पैसे, ईडीच्या छाप्यात पलंगाखाली सापडले 7 कोटी
प. बंगालमध्ये सध्या एकामोगून एक रोख पैसे जप्त करण्याच्या घटना सुरु आहेत. फेडरल बँकेच्या तक्रारीनंतर या प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली. कोलकात्याच्या गार्डनरीच परिसरात एका व्यावसायिकाच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात पलंगाखाली लपवण्यात आलेली सात कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
कोलकाता – मोबाईल गेमिंग एपच्या (Mobile gaming app)माध्यमातून अनेक जणांची फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात कोलकातात ईडीने (ED raid)छापेमारी केली आहे. या व्यावसायिकाच्या घरी हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात आत्तापार्यंत आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात येत असलेली रक्कम पंधरा कोटींपर्यंत (15 crores)जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मोबाईल गेमिंप एपत्या माध्यमातून लोकांच्या खात्यांतून ही टोळी पैसे उडवत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. हा सगळा घोटाळा दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते आहे. या प्रकरणात ईडीकडे तक्रार करण्यात आली होती.
West Bengal | RBI & SBI Bank officials, carrying 8 cash counting machines, reach the residence of one businessman Nisar Ahmed Khan in Garden Reach, Kolkata. Central force deployed outside his residence from where ED recovered huge amounts of cash. pic.twitter.com/25BJ6nrYN2
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 10, 2022
प्लॅट्सिकच्या बॅगमध्ये सापडले पैशांचे भांडार
प. बंगालमध्ये सध्या एकामोगून एक रोख पैसे जप्त करण्याच्या घटना सुरु आहेत. फेडरल बँकेच्या तक्रारीनंतर या प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली. कोलकात्याच्या गार्डनरीच परिसरात एका व्यावसायिकाच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात पलंगाखाली लपवण्यात आलेली सात कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये दोन हजार आणि पाचशे रुपयांचे बंडल जप्त करण्यात आले आहेत. ईडीची टीम अजूनही घटनास्थळी असून चौकशी आणि छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.
In search operations today, under the provisions of the Prevention of Money Laundering Act (PMLA), 2002, at 6 premises in Kolkata in connection with an investigation relating to Mobile Gaming Application, Rs 7 Crores cash found so far, counting of the amount is still in progress. pic.twitter.com/VIkoLzE54K
— ANI (@ANI) September 10, 2022
विशेष म्हणजे ईडीकडून कोलकाता पोलिसांना या छापेमारीची कल्पना देण्यात आलेली नव्हती. सूत्रांच्या माहितीवरुन जप्त करण्यात आलेल्या पैशांची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. हा आकडा १५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यात यापूर्वी ५० कोटींची रोख रक्कम जप्त
यापूर्वी पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची नीकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरी केलेल्या छापेमारीत ५० कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर ममता यांनी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली आहे. अर्पिताच्या घरातून काही डायऱ्याही जप्त करण्यात आल्या आहेत, त्यात कोडवर्डमधून लाचखोरीचे पैसे घेतल्याचे आणि लिहिल्याचा संशय वर्तवण्यात येतो आहे.