8 वर्षांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपरचा IQ आइनस्टाईनपेक्षा जास्त, यंदाचा बाल पुरस्कार पटकावला

यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कार-2023 च्या अकरा विजेत्यांमध्ये कर्नाटकातील 8 वर्षीय अँड्रॉइड एप डेव्हलपर ऋषी शिव प्रसन्ना याचाही समावेश आहे. त्याचा बुद्ध्यांक महान शास्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईनच्या IQ पातळीपेक्षा जास्त आहे.

8 वर्षांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपरचा IQ आइनस्टाईनपेक्षा जास्त, यंदाचा बाल पुरस्कार पटकावला
RISHIPRASANNAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 8:31 AM

दिल्ली : यंदाचे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारात एका बाल सॉफ्टवेअर डेव्हलपरचाही समावेश आहे. अवघ्या आठ वर्षांच्या असलेल्या या सर्वात छोट्या मान्यताप्राप्त एड्रोईड सॉफ्टवेअर डेव्हलपरचा यंदाच्या अकरा बाल पुरस्कार विजेत्यामध्ये समावेश आहे. त्याचा विविध एड्रॉईड सॉफ्टवेअर विकसित करण्यात हातखंडा आहे. त्याने विविध विषयांवर पुस्तकेही लिहीली आहेत. कोण आहे हा जगातला सर्वात लहान ‘टेकी’ त्याबद्दल माहिती वाचूया..

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर केले जात असतात, यंदा एकूण अकरा प्रतिभाशाली मुलांची निवड त्यासाठी झाली आहे. यात एका नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते नाव म्हणजे कर्नाटकचा ऋषी शिव प्रसन्ना. ऋषी हा अवघ्या आठ वर्षांचा असून त्याला लहानपणापासून काही तरी इनोटीव्ह गोष्टी करण्याची आवड आहे. या बालकाने संगणकीय सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. त्याला एड्रॉईड डेव्हलपर म्हणून सर्टीफाईड करण्यात आले आहे. ऋषी शिव प्रसन्ना हा मेन्सा इंटरनॅशनल या संस्थेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहे, ही संस्था जगभरातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित आयक्यू सोसायटी आहे.

अवघा दोन वर्षांचा असताना वाचू लागला

ऋषी शिव प्रसन्ना हा अवघ्या चार वर्ष पाच महिन्यांचा असताना या सोसायटीचा सदस्य झाला. त्याचे यश केवळ बुद्धीमत्तेच्या प्रमाणित चाचण्यांपुरतेच मर्यादित नाही. तो दोन वर्षांच्या वयातच वाचन शिकला. वयाच्या तीन वर्षांपर्यंत, जेव्हा मुले नुकतीच वर्णमाला शिकू लागलात तेव्हा प्रसन्ना गणिते, भौतिक,आकाशगंगा, अंतराळविश्व, ग्रहांच्या आणि आकारांबद्दल बोलू लागला.

बुध्यांक पातळी ते पुस्तकांचा लेखक

ऋषी याचा विविध एड्रॉईड सॉफ्टवेअर विकसित करण्यात हातखंडा आहे. त्याने विविध विषयांवर पुस्तकेही लिहीली आहेत. त्याच्या आयक्यू लेव्हल ( बुध्यांक ) 180 आहे. भौतिक शास्रातील अनेक संकल्पना बदलणारे शास्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन यांचा आयक्यू लेव्हल 160 होता. त्यांच्याहून जास्त या छोट्या संशोधकाची आयक्यू लेव्हल आहे. ऋषी शिव प्रसन्ना याला काल राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. सर्वात तरुण प्रमाणित Android विकासकांपैकी एक, प्रसन्ना यांने ‘Elements of Earth’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.