पाणी की विष?: देशातील 80 टक्के लोकसंख्या पिते आहे विषारी पाणी, राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती, जबाबदारी कुणाची?
प्रत्येक व्यक्ती दरदिवशी सरासरी 3 लिटर पाणी पितो असे मानण्यात येते. सरकारी आकडेवारीनुसार आरोग्यदायी राहण्यासाठी दररोज किमान 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज 2 लिटर पाणी पित असाल तर याचा अर्थ तुमच्या शरिरार काही प्रमाणात विष जात आहे.
नवी दिल्ली – देशातील पाण्याची गुणवत्ता झपाट्याने बिघडत असल्याची माहिती केंद्र सरकारने (Center Government) राज्यसभेत दिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आत्ता आपण जे पाणी पितो आहोत ते विषारी (poisonous)आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांत भूगर्भातील पाण्यांमध्ये विषारी घटक मिळत असल्याचे समोर आले आहे. जल शक्ती मंत्रालयाच्या (Jal Shakti)एका कागदपत्रानुसार, देशातल्या 80 टक्के जनतेला जमिनीतून पाणी मिळते. जर भूजलात मोठ्या प्रमाणात धोकादायक घटक सापडले तर त्याचा अर्थ ते पाणी विष झालेले आहे. राज्यसभेत सरकारतर्फे लोकसंख्येच्या वस्त्यांची संख्याही सांगण्यात आली. ज्या ठिकाणी पाण्याचे मूळ स्रोत हे प्रदूषित झालेले आहेत. त्या आकडेवारीनुसार, 671 क्षेत्रांत फ्लोराईड, 814 क्षेत्रांत आर्सेनिक, 14,079क्षेत्रात आयर्न, 9930 क्षेत्रांत सलीनिटी, 517 क्षेत्रांत नायट्रेट आणि 111 क्षेत्रांत धातूंमुळे पाणी प्रदूषित झालेले आहे.
किती धोकादायक आहे हे पाणी?
प्रत्येक व्यक्ती दरदिवशी सरासरी 3 लिटर पाणी पितो असे मानण्यात येते. सरकारी आकडेवारीनुसार आरोग्यदायी राहण्यासाठी दररोज किमान 2 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज 2 लिटर पाणी पित असाल तर याचा अर्थ तुमच्या शरिरार काही प्रमाणात विष जात आहे.
शहरांपेक्षा गावात विषारी पाण्याचे संकट तीव्र
सरकारने हेही स्पष्ट केले की, शहरांच्या तुलनेत गावांत ही समस्या अधिक तीव्र आहे. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अजूनही गावांमध्येच राहते. तिथे पाण्याचे स्रोत हे हँडपंप, विहिरी, तलाव, नद्या हेच आहेत. या ठिकाणी येणारे पाणी थेट जमिनीतून येते. याच्या व्यतिरिक्त हे पाणी स्वच्छ करण्याची कोणतीही प्रक्रिया अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांना विषारी पाणी प्य़ावे लागत आहे.
सरकारने काय उचलली आहेत पावले
केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले की, पाणी हा राज्यांचा विषय आहे. त्यामुळे लोकांना पिण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध करुन देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र तरीही स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना सुरु करण्यात आल्या असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. 21 जुलै रोजी सरकारने लोकसभेत माहिती दिली होती की, ऑगस्ट 2021 मध्ये जल जीवन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीम भागातल्या प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारने दिलेल्या लेखी उत्तरानुसार देशातील 19.15 कोटी ग्रामीण घरांपैकी, आत्तापर्यंत 9.81 कोटी घरांमध्ये नळातून पाणी देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.